- मयूर पठाडेतुमच्या घरी किती जण आहेत? म्हणजे तुम्ही कुटुंबवत्सल असालच, पण रोज जेवण करताना तुम्ही एकटेच जेवण करता कि कुटुंबासमवेत जेवण करता? उगीच नाही विचारत हा प्रश्न. तुमच्या आयुष्यचा हा प्रश्न आहे आणि त्यात विज्ञानही दडलेलं आहे.अनेक जण कुटुंबवत्सल असले, त्यांचं आपल्या कुटुंबावर प्रेम असलं, तरी बºयाचदा परिस्थितीच अशी असते किंवा नोकरी, कामाच्या व्यापामुळे त्यांना एकट्यानंच जेवावं लागतं. जोडीला कोणीच नसतं. काही वेळेस एकटेपणाच्या समस्येमुळेही अनेक जण एकट्यानंच जेवण करतात, पण असं असेल तर तुमच्यासाठी ते घातक आहे.यासंदर्भात नुकताच एक व्यापक अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. दक्षिण कोरियातील डॉन्गक यनिव्हर्सिटितील शास्त्रज्ञांनी जवळपास आठ हजार व्यक्तींचा दीर्घ अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.एकट्यानं जेवण करणाºयांत आरोग्याच्या समस्या तर वाढतातच, पण त्यांच्यात जंक फूड खाण्याचं प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं. मानसिक समस्येचाही त्यांना सामना करावा लागतो.जे लोक एकट्यानंच जेवण करतात अशा जवळपास ४५ टक्के लोकांना स्थूलपणाची समस्या जाणवते, तर ६४ टक्के लोकांमध्ये पचनाच्या तक्रारी आढळून येतात. अर्थातच यात महिला आणि पुरुष दोघंही आले. महिलांमध्ये हे प्रमाण तुलनेनं कमी असलं तरी त्यांच्यातही जवळपास २९ टक्के स्त्रियांत पचनाचे विकार आढळून आले.त्यामुळे तुम्ही कुणीही असा, विवाहित असा, कुटुंबवत्सल असा किंवा एकटेच राहाणारे, पण निदान जेवताना तरी आपल्या सोबत कोणीतरी जोडीदार घेऊन त्यांच्या सोबतीनं जेवण घेत चला. त्यामुळे तुमच्या आरोग्याच्या समस्या नक्कीच होतील दूर.
एकट्यानंच जेवत असाल, तर वाढेल स्थूलपणा आणि पोटही बिघडेल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 5:43 PM
घुम्यासारखं एकट्यानंच जेवण्यापेक्षा कुटुंबासोबत किंवा मित्रमंडळींसोबत करा जेवण.
ठळक मुद्देएकट्यानंच जेवण करणाºयांत आरोग्याच्या समस्या तर वाढतातच, पण त्यांच्यात जंक फूड खाण्याचं प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं.मानसिक समस्येचाही त्यांना सामना करावा लागतो.जे लोक एकट्यानंच जेवण करतात अशा जवळपास ४५ टक्के लोकांमध्ये स्थूलपणाची तर ६४ टक्के लोकांमध्ये पचनाच्या तक्रारी आढळून येतात.