(Image Credit : planoinformativo.com)
सध्या अनेक महिला पुरूषांच्या बरोबरीने सर्वच कामं करताना दिसतात. मग ते ऑफिस असो किंवा घर. अनेक जबाबदाऱ्या त्या पार पाडत असतात. पण या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना त्या स्वतःकडे मात्र बऱ्याचदा दुर्लक्ष करतात. अनेकदा सर्व काम करताना त्यांची धावपळ होते. त्यामुळे कधीकधी तणाव, चिडचिड आणि डिप्रेशनसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. यासर् समस्यांपासून सुटका करण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे, आपल्या डाएटकडे लक्षं द्या. तुम्हीही वर्किंग वुमन असाल तर आज आम्ही तुम्हाला एक खास डाएट प्लॅन सांगणार आहोत.
नाश्ता करायला विसरू नका
सकाळचा नाश्ता हेल्दी असतो, असं आपण अनेकदा ऐकतो. नाश्त्यामध्ये इडली आणि डोसा. कार्ब्ससाठी पराठा, पोहे आणि प्रोटीनसाठी अंडी यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. पोटभर नाश्ता केल्याने तुम्हाला दिवसभर काही खाण्याची गरजही भासणार नाही. सकाळी 11 वाजता एक कप ग्रीन-टी प्यायल्याने अॅन्टीऑक्सिडंट मिळतात.
पौष्टिक खिचडी देते ताकद
नाचणीची पावडर लो-फॅट असणाऱ्या दूधामध्ये एकत्र करून एक बॅटर तयार करा. चवीनुसार साखर एकत्र करा. हा नाश्ता आपली दररोजचं कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्सची गरज लगेच पूर्ण करण्यासाठी मदत करतो. यासोबत एका फळाचाही समावेश करा.
दुपारचं जेवण ठरतं फायदेशीर
दुपारचं जेवणं अवश्य करा. तुमची कोणतीही महतत्वाची मिटिंग असली तरिही त्यातून वेळ काढून दुपारचं जेवण अवश्य करा. घरी तयार केलेलं जेवणचं जेवा. घरी जेवताना कधीही चालून-फिरून खाऊ नका. व्यवस्थित बसून जेवा आणि प्रत्येक घास चावून खा. जेवण हलकं घेतलतं तरी चालेल पण जेवणामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि कार्ब्स यांचा समावेश करा. लंच करताना एक ग्लास थंड छास पिण्यास विसरू नका. छास अन्न पचविण्यासाठी उपयोगी ठरत.
जर जेवण चटपटीत असेल
चपाती, भाजी, भात किंवा राजमा यासारख्या साधारण लंचला एखादं लोणचं मजेशीर बनवू शकतं. किसलेली हळद, आंबा किंवा कैरी आणि आल्याचं मिश्रण लिंबाच्या रसासोबत एकत्र करून ठेवा. आंबटपणा आणि उत्तम चवीसोबत अॅन्टीऑक्सिडंट तत्वांनीयुक्त लोणचं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतं.
रात्रीच्या जेवणात हलक्या पदार्थांचा समावेश
मुलं पास्ता किंवा नुडल्स खाण्याचा हट्ट करत असतील तर गव्हापासून तयार करण्यात आलेला पास्ता आणि नुडल्सचा वापर करा. त्याशिवाय हंगामी फळं आणि भाज्यांचा आहारामध्ये समावेश करा. सलाडवर लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल ठेवा. आठवड्यातून कमीत कमी तीन दिवस रात्रीच्या जेवणासोबत सूप ट्राय करा.
टिप : प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे आहारमध्ये आपल्या शारीरिक क्षमतेनुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पदार्थांचा समावेश करणं फायद्याचं ठरतं.