सकाळी उठल्यावर अनेकदा आपण काही न खाताच घराबाहेर पडतो. अनेकदा घरातले ओरडून कंटाळून जातात. पण आपण काही ऐकायचं नाव घेत नाही. आपण या सवयीकडे अगदी सहज दुर्लक्ष करतो. अनेकदा यामागे सकाळची धावपळ असते. तर अनेकदा कंटाळ्यामुळे करतात. अनेक व्यक्तींना ही सवय होऊन जाते. पण तुम्हाला माहीत आहे का? असं करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. तुम्हालाही जर नाश्ता न करण्याची सवय झाली असेल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर लठ्ठपणाला सामोरं जाण्यासाठी तयार रहा.
एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, नेहमी नाश्ता करणाऱ्या 10.9 टक्के लोकांच्या तुलनेत सकाळी नाश्ता न करणारे 26.7 टक्के लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. या संशोधनासाठी एका दलाने 2005 ते 2017 पर्यंत 347 लोकांच्या नाश्ता करण्याच्या सवयीचा अभ्यास केला. यामध्ये सहभागी करण्यात आलेल्या व्यक्तींचं वय 18 ते 87 वर्ष होतं. संशोधनात यांची उंची, वजन, कंबर यांची मापंदेखील घेण्यात आली.
अमेरिकेतील मेयो क्लिनिकमधील संशोधक केविन स्मिथ यांनी सांगितले की, जर तुम्ही कधीतरीच नाश्ता करत असाल तर ते शरीराच्या मध्यभागातील अवयवांमध्ये म्हणजेच पोटाच्या भागात वजन वाढण्याचं कारण ठरतं. परंतु ज्या व्यक्ती कधीच नाश्ता करत नाहीत. त्यांना लठ्ठपणाचा त्रास सहन कराव लागतो. ज्या लोकांनी कधी नाश्ता नाही केला. त्यांनी मागील काही वर्षात स्वतः वजन वाढल्याचे मान्य केलं आहे.
या गोष्टी लक्षात ठेवा :
सकाळी नाश्ता न केल्यामुळे लठ्ठपणाचा त्रास होण्याची शक्यता 50 टक्क्यांनी वाढते. जेव्हा तुम्ही सकाळी नाश्ता न केल्यामुळे तुम्हाला दिवसभरात गरजेपेक्षा जास्त भूक लागते. त्यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त अन्नाचं सेवन करता. त्यामुळे वजन वाढते.
सकाळी नाश्ता न केल्यामुळे शरीरातील एनर्जी लेव्हल आपोआप कमी होते. ज्यामुळे आपल्याला थकवा येतो आणि काम करणं अशक्य होतं.
सकाळी नाश्ता न केल्यामुळे लंचपर्यंत जास्त भूक लागते. ज्यामुळे बऱ्याचदा भूक सहन न झाल्यामुळे व्यवस्थित जेवणं न करता काहीही खातात. त्यामुळे स्ट्रेस आणि डिप्रेशन वाढू लागतं.
सकाळी व्यवस्थित नाश्ता केल्यामुळे आपला हायपोग्लाइसीमिया, हायपर्टेंशन आणि डायबिटीज यांसारख्या आजारांपासून बचाव होतो.