हृदयविकाराचा झटका आला असल्यास या गोष्टी अवश्य करा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 7:36 AM
एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असल्यास त्या व्यक्तीला त्वरित रुग्णायलात दाखल करावे. त्या दरम्यान पुढील गोष्टी अवश्य करून पाहाव्यात.
तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला असेल तर तुमचे शरीर तुम्हाला याचे संकेत लगेचच देते. तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला आहे हे तुमच्या लगेचच लक्षात येऊ शकते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर व्यक्तीला तीन तासाच्या आत योग्य उपचार मिळाले तर त्या व्यक्तीची तब्येत सुधारण्याची नक्कीच शक्यता असते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर वेळ न घालवता काहीच मिनिटांत त्या व्यक्तीला योग्य उपचार पुरवणे गरजेचे आहे. तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला आहे हे पुढील गोष्टींवरून तुम्हाला कळू शकते...हृदयविकराचा झटका आल्यास तुमचा डाव हात, पाय, चेहऱ्याची डावी बाजू यांच्यात असलेली सगळी ताकद निघून जाते. तसेच तुम्हाला बोलायला आणि समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे समजायचा खूपच त्रास होता. एवढेच नव्हे तर तुमच्या शरीराची एक बाजू लुळी पडल्यासारखी वाटते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याचा परिणाम तुमच्या डोळ्यावर होतो. तुम्हाला एका किंवा दोन्ही डोळ्यांनी व्यवस्थितपणे दिसत नाही. तसेच तुम्हाला चक्कर येते. मळमळल्यासारखे होते. ही लक्षणे दिसत असली तर तुम्हाला तातडीने उपचार घेण्याची गरज आहे हे लक्षात ठेवा.आपल्या समोर असलेल्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आहे की नाही हे आपल्याला लगेचच कळू शकते यासाठी काही गोष्टी जरूर कराव्यात.तुमच्या समोर असलेल्या व्यक्तीला त्रास होत आहे असे तो सांगत असल्यास लगेचच डॉक्टरांना फोन करा किंवा त्याला डॉक्टरांकडे त्वरित नेण्यासाठी व्यवस्था करा. त्या दरम्यान या गोष्टी करून पाहा म्हणजे त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आहे का नाही हे तुम्हाला कळेल. त्या व्यक्तीला हसायला सांगा... त्याला हृदयविकाराचा झटका आला असल्यास त्याला हसता येणार नाही. तसेच त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. बोलताना साधे शब्द बोलायला देखील त्याला त्रास होत असल्यास त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे हे तुम्हाला ओळखता येईल. तसेच त्या व्यक्तीला हात उंचवायला सांगा त्याचा हात त्याला उचलता येत नसेल त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे तुम्हाला कळेल. हृदयविकाराचा झटका आला आहे हे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही रुग्णायलात पोहोचण्याच्याआधीच डॉक्टरांना त्याची कल्पना देऊ शकता आणि डॉक्टर व्यक्ती रुग्णायलात पोहोचण्यापूर्वी तुम्हाला काही उपाय सांगू शकतात.