दुध ही अशी गोष्ट आहे जी नाशवंत आहे. आपण दुध फ्रीजमध्ये अशासाठी ठेवतो ती ज्यामुळे ते खराब होऊ नये, फाटू नये आणि जास्त काळ तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. जर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवायच्या वस्तू अथवा पदार्थ नीट ठेवत नसाल तर त्यामुळे तुमचा तोटा होऊ शकतो. फ्रिजमध्ये दुध व्यवस्थित न ठेवल्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगायला लागतात. तुमच्या आरोग्यासाठी ते अत्यंत हानीकारक असते. दुध फ्रिजमध्ये नेमके कसे ठेवावे हे जाणून घेऊया...
जर तुम्ही दुधाला सर्वात वरच्या कप्प्यात ठेवता तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. दुध फ्रिजमध्ये ठेवण्याची ती अत्यंत चूकीची पद्धत आहे. वरच्या शेल्फमध्ये इतर भागांच्या तुलनेत जास्त गरमी असते त्यामुळे दुध खराब होऊ शकते. त्यामुळे दुध सर्वात खालच्या भागात ठेवा. त्यामुळे दुध खराब होणार नाही. तुम्ही दुध फ्रीजच्या बॅक पोर्शनमध्येही ठेऊ शकता. कारण, दुधात जीवाणू लगेच उत्पन्न होतात. दुध बॅक पोर्शनमध्ये ठेवल्यामुळे दुधात जीवाणू निर्माण होत नाहीत.