- मोहिनी घारपुरे-देशमुखआपल्याकडे ‘आॅर्गेनिक क्लोदिंग’ ही टर्म काही नवीन नाही. सुती कपडे, खादी आणि नैसर्गिक कापडांचा वापर आपल्याकडे फार वर्षांपूर्वीपासून होतो आहे. परंतु अलिकडे फॅशन इंडस्ट्रीनं मात्र आॅर्गेनिक क्लोदींग ही एकप्रकारची चळवळ सुरू करून या नैसर्गिक कपड्यांना एक नवा आयाम दिला आहे. फॅशन जगतातील नामांकित ब्रँण्डसनी अलिकडे नैसर्गिक कापड आणि नैसर्गिक रंग यांचा वापर करून डिझायनर कपड्यांची निर्मिती करणं सुरू केलं आहे. यामध्ये विशेषत: सती, ज्यूट, सिल्क, रेशमी आणि लोकरीच्या कापडाचा उपयोग केला जातो. या कपड्यांची किंमत फार जास्त असते कारण हे कपडे नैसर्गिकरित्या तयार करण्यात आलेल्या कापडापासून बनवलेले असतात. मात्र असे असले तरी अनेक ब्रॅण्डस संपूर्णत: आॅर्गेनिक कपडे तयार करण्याऐवजी आॅर्गेनिक आणि नॉन आॅर्गेनिक अशा दोन्हीही प्रकारच्या कपड्यांचा (रंग किंवा धागे अशा अर्थानं) वापर करून मग तऱ्हेतऱ्हेचे फॅशनेबल कपडे बनवतात आणि बाजारात विकतात.
आॅर्गेनिक क्लोदिंगची वैशिष्ट्ये* हे कापड नैसर्गिकरित्या बनवलेलं असतं. * या कापडावर नैसर्गिक रंग वापरले जातात* ज्यूट वगळता अन्य सर्व आॅर्गेनिक कापड हे अत्यंत तलम आणि मऊ असतं. * यामुळे त्वचेला अधिक सुखद अनुभव मिळतो.जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार दरवर्षी सुमारे 20000 रूग्णांच्या मृत्यूचं कारण मॅन्युफॅक्चरींग प्रोसेसदरम्यान वापरण्यात आलेल्या खतांच्या विषबाधेमुळे होतो अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे कापड उद्योजकांपैकी काही ब्रॅण्ड्सनी ही बाब लक्षात घेत आॅर्गेनिक क्लोदींग ही एकप्रकारची चळवळच सुरू केली असल्याचं समजतं. त्यामुळे जर तुम्हीही नेचर लव्हर असाल आणि नैसर्गिक उत्पादनांना प्रमोट करत असाल तर नक्कीच तुम्हीही या चळवळीचा एक भाग होऊ शकता. फॅशन इंडस्ट्रीच्या पावलावर पाऊल ठेऊन तुम्हीही आॅर्गेनिक कपडे वापरायला सुरूवात करू शकता. विशेषत: गरोदर स्त्रियांनी या संधीचा लाभ घ्यायला हवा, कारण या काळात कपड्यामुळे त्वचा घासली जाऊन स्ट्रेच माकर््स येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे त्वचेची काळजी घ्यायची असेल तर या प्रकारचे मऊ नैसर्गिक गुणांचे कपडेच वापरायला हवेत.
जगभरातले आॅर्र्गॅनिक क्लोदींगचे आघाडीचे ब्रॅण्ड्स 1.शिफ्ट टू नेचर2.पॅक्ट3.थॉट4.ब्यूमॉन्ट आॅर्गेनिक5.बिबीको6.नोक्टू7.कलर्ड आॅर्गेनिक्स8.कुयिची9.ब्रूक देअर10.लूमस्टेटआॅर्गेनिक क्लोदींगमधील भारतातील आघाडीचे ब्रँण्ड्स1.इंडीग्रीन2.नो नॅस्टीज3.फोर्टी रेड बँगल्स4.सॅमतना5.त्वच (त्वचा नाही)6.अनोखी7.यूव्ही अँड डब्ल्यू8.भू सत्त्व9.डू यू स्पीक ग्रीन10.एथिकस