बाराही महिने उपलब्ध असलेले अक्रोड अनेकांना आवडतात. ड्रायफ्रुट्स म्हणून गोड पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. अक्रोडात फॅट असते पण त्यामुळे कोणताही अपाय होत नाही कारण ते चांगले फॅट असते. तसेच यामध्ये पोषकतत्वे व कॅलरीज मोठ्याप्रमाणात असतात. अक्रोड जर तुम्ही रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ले तर याचे अगणित फायदे आहेत. अक्रोड खाण्याचा सर्वात मोठ्ठा फायदा वजन कमी करणाऱ्यांना होतो.
वजन कमी करणेअक्रोडमध्ये फॅट असते पण ते चांगले फॅट असते त्यामुळे शरीराला त्याचा फायदाच होतो. दुसरे तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा भूक लागल्यावर अक्रोड खा. यामुळे लवकर भूकही लागत नाही आणि तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम वाढते. त्यामुळे वजन नियंत्रित राहते. अक्रोड तुम्ही नुसते खाऊ शकता, सॅलडमध्ये मिक्स करून खाऊ शकता, ओटमीलमध्येही टाकून खाऊ शकता.
अक्रोड खाण्याचे इतर फायदे
हृदयविकारांना दूर ठेवतेअक्रोडमध्ये वर म्हटल्याप्रमाणे चांगले फॅट असते. त्यामुळे हृदयासाठी ते उत्तम असते. अक्रोडमध्ये असलेल्या फॅटमुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. कॉलेस्ट्रॉल हे हृदयासाठी घातक असते. त्यामुळे रोज अक्रोड खा व हृदयाच्या विकारांना दूर ठेवा.
पचनक्रिया सुरळीत होतेआपल्या शरीरातील पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी अक्रोड नक्की खा. यात आपल्या शरीरातील मायक्रोबियम स्वस्थ राहते म्हणून पाचनक्रिया सुरळीत होते.
कॉग्निटीव फंक्शन वाढवतेअक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि फोलेट असते. या सर्व घटकांमुळे मेंदुचे स्वास्थ्य उत्तम राहते. त्याचबरोबर अक्रोडमध्ये इतरही काही पोषकतत्व असतात जी आपल्या मेंदुसाठी चांगली असतात. यामुळे मुडही चांगला राहतो.