IIT रूरकीमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, चिंचेच्या बियांपासून चिकनगुनियावर उपचार करणं शक्य होऊ शकतं. आयआयटी रूरकीमधील दोन प्रोफेसरांनी चिंचेच्या बियांपासून चिकनगुनियावर करण्यात येणाऱ्या उपचारांचा शोध घेतला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार चिंचेच्या बियांमध्ये एक असं प्रोटीन आढळून येतं ज्यामध्ये जीवाणूंची वाढ रोखण्यासाठी उपयोगी असे गुणधर्म असतात. त्यांचं असं मत आहे की, चिकनगुनियावर उपाय म्हणून औषध तयार करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
आयआयटीमधील या संशोधकांनी हे औषध तयार करण्यासाठी पेटंट मिळवण्यासाठीही अर्ज केला आहे. चिंचेमध्ये आढळून येणारे प्रोटीनच्या अॅन्टीवायरल कम्पोजीशनचं पेटेंट घेतल्यानंतर औषध तयार करण्यात येईल.
प्रोफेसर शैली तोमर यांनी सांगितले की, 'भारतामध्ये चिंचेला अनेक औषधी गुणधर्मांसाठी ओळखलं जातं. त्याचप्रमाणे आयुर्वेदातही चिंचेचे अनेक आरोग्यदायी गुणधर्म सांगितले आहेत. याची फळं, बिया, पानं आणि मूळांचा उपयोग अनेक आजारांवर उपाय म्हणून करण्यात येतो.
संशोधकांनी आपल्या संशोधनातून असे निष्कर्ष आढळून आले की, चिंचेच्या बियांमध्ये आढळून आलेलं लॅक्टिन ग्लाइकेन्स आणि शुगर मॉलीक्यूल्ससोबत एकत्र करण्यात येतं. ज्यामध्ये एन एसिटिलग्लूकोसामीन (एनएजी) असतं. त्यामुळे शरीरातील पेशींमध्ये जीवाणू प्रवेश करत नाहीत.
चिंचेचे आरोग्यदायी फायदे :
- वजन कमी करण्यासाठी चिंचेचे सेवन करणे खूप फायदेशीर असते. यामध्ये हायड्रोऑक्साइट्रिक अॅसिड असतं जे शरीरात फॅट बर्न करणाऱ्या इन्जाइमला वाढवतं. परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.
- डायबिटीजच्या रुग्णांसाठी चिंच सेवन करणे फायदेशीर मानले जाते. ही कार्बोहायड्रेट्सला पचवण्यात मदत करते. ज्यामुळे रक्तामध्ये ग्लूकोज आणि इन्सुलिन संतुलित राहते.
- चिंच शरीरात रक्तप्रवाह सुरळीत ठेवते आणि लोहाची कमतरता पूर्ण करते. यामुळे रेड ब्लड सेल्स अधिक बनतात. अशक्तपणा, स्मरणशक्ती आणि पोटासंबंधीत समस्या कमी होतात.
- चिंचेच्या सेवनामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हे शरीरातील वाईट कॉलेस्ट्रॉल कमी करते आणि यामधील पोटॅशियम, बीपी नियंत्रित करण्यात मदत करत असल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे.
- चिंचेचे सेवन करणे हे पचनक्रियेसाठी खूप चांगले असते. यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असतात जे पचनक्रियेत मदत करते. कॉन्सटिपेशनपासून तर डायरियासारख्या समस्यावर ही फायदेशीर ठरते.