पुणे : कर्करोगावरील उपचार म्हटले की डाेळ्यापुढे केमाेथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया हे उपचार प्रामुख्याने येतात. आता त्यात आणखी एका उपचाराची भर पडली आहे ती म्हणजे ‘इम्यूनोथेरपी’. रुग्णाची कर्करोगाविराेधात लढण्याची प्रतिकारशक्ती वाढवून त्यावर मात करणारी ही उपचारपद्धती विकसित झाली आहे. परंतु, ती महागडी असल्याने प्रतिसाद कमी मिळत आहे.
कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ४ फेब्रुवारी हा ‘जागतिक कॅन्सर दिन’ पाळला जाताे. यावर्षी या दिनाची थीम ही ‘क्लाेज द केअर गॅप’ म्हणजेच कर्करोगावरील उपचारात येणारे अडथळे कमी करणे अशी आहे. बदललेली जीवनशैली, व्यसने, पिकांवर कीटकनाशकांचा व रासायनिक खतांचा अतिवापर, प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थांचा वाढता वापर आदी कारणांमुळे कर्करोग वाढत आहे. इम्यूनाेथेरपी काेणत्या रुग्णांना उपयुक्त ठरेल. ते जेनेटिक तपासणीद्वारे ठरवले जाते.
इम्यूनाेथेरपी हे इंजेक्शन स्वरूपात उपलब्ध आहे. त्याचे उपचार दाेन वर्षांपर्यंत चालतात. यामुळे रुग्णातील प्रतिकारशक्ती वाढून कर्करोगाच्या पेशींवर मात करते. परंतु, ती प्रत्येक रुग्णांवर चालेलच असे नाही. त्यासाठी काही जनुकीय तपासण्या कराव्या लागतात.
aकर्करोगावरील ही साइड इफेक्ट नसलेली उपचारपध्दती आहे. १०० पैकी ५ ते ६ रुग्ण या उपचाराला पसंती देत आहेत. - डाॅ. तुषार पाटील, कर्करोगतज्ज्ञ, सह्याद्री हाॅस्पिटल.