- मयूर पठाडेकाहीही होऊ द्या, फिरून फारून सर्व गोष्टी आपल्या तब्येतीवरच येतात. सर सलामत तो पगडी पचास.. तुमचं आरोग्य चांगलं असेल तर सारं काही उत्तम.. पण हे आरोग्य उत्तम राखायचं तरी कसं? अनेक जण त्यासाठी अनेक प्रकारचे उपाय सांगतात. त्यामुळेच अनेकांना औषधापेक्षा रोग परवडला असं वाटतं आणि ते आरोग्याच्या फंदात पडत नाहीत.काय करायचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी? आज अगदी सोप्पे उपाय मी तुम्हाला सांगणार आहेत. रोजच्या रोज आणि काहीही टेन्शन घेता करता येण्यासारखे. बघा करून.आरोग्याचं रहस्य१- कायम फिरते राहा. तुम्ही जितके चालते फिरते राहाल तितके तुम्ही फ्रेश आणि उत्साहित राहाल. लहानपणी ‘छप्पापाणी’ किंवा ‘लपाछपी’ नावाचा एक खेळ खेळला जायचा. त्यावेळी लपणारी मुलं ज्याच्यावर राज्य आहे, त्याच्यासाठी घोषणा द्यायचे.. चलते फिरते आग लगाओ.. तसंच आहे. कायम चालत राहा..साधी गोष्ट आहे.. समजा तुमचा फ्लॅट इमारतीच्या दुसºया तिसºया मजल्यावर आहे. अशावेळी लिफ्टनं न जाता पायºयांनी जा. आॅफिसमध्ये छोटीमोठी कामं शिपायाला न सांगता, तुम्हीच उठून करा. निदान स्वत:ची कामं तरी..२- रोजचा कामाचा रगाडा कोणाला चुकलाय? अशावेळी कामाच्या मागे हात धुवून न लागता थोडं स्लो डाऊन करा. थोडी शांतता अनुभवा आणि मग पुन्हा कामाला भिडा.३- आहारात फॅट्स टाळा. आॅईली पदार्थ शक्यतो टाळता येतील तेवढा टाळा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहाण्यास मदत होईल.४- टेक्नॉलॉजीला आपला मित्र बनवा. उदाहरणार्थ मोबाईल. त्यात अनेक अॅप तुम्हाला डाऊनलोड करता येतील, जे तुमच्या आरोग्याची काळजी घेतील. अर्थातच मोबाईलच्या आहारी मात्र जाऊ नका.५- आपल्या ब्लड प्रेशरची नियमित तपासणी करत चला. आपलं ब्लड प्रेशर वाढलं किंवा कमी तर नाही ना झालं, याची तपासणी नियमित करीत जा.या अशा अगदी साध्या सोप्या गोष्टी. रोजच्या रोज आणि सहज करता येतील अशा. अगोदर या गोष्टींपासून तर सुरू करा. त्यानं निश्चितच फरक पडेल. तुम्हाला वाटलंच आणखी काही करायचं तर तुम्हाला त्याचा नंतरही विचार करता येईल.आरोग्याविषयीच्या आणखी काही टिप्स पाहू या पुढच्या भागात..
‘चलते फिरते आग लगाओ’..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 4:17 PM
तुमच्या आरोग्याचं पहिलं आणि महत्त्वाचं रहस्य..
ठळक मुद्देकायम फिरते राहा. तुम्ही जितके चालते फिरते राहाल तितके तुम्ही फ्रेश आणि उत्साहित राहाल.कायम फिरते राहा. तुम्ही जितके चालते फिरते राहाल तितके तुम्ही फ्रेश आणि उत्साहित राहाल.आॅईली पदार्थ शक्यतो टाळता येतील तेवढा टाळा.टेक्नॉलॉजीला आपला मित्र बनवा. अनेक अॅप तुमच्या आरोग्याची काळजी घेतील.