शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

या' पाच गोष्टींचा नाश्त्यात समावेश करा, दिवसभर राहाल फ्रेश आणि फिट...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 1:16 PM

या लेखातून आपण अशा पाच ब्रेकफास्टविषयी माहिती जाणून घेऊयात. जे पौष्टिक आणि चवदार असण्याबरोबर प्रोबायोटिकही आहेत.

न्यूट्रिशनिस्टच्या म्हणण्यानुसार, दररोज सकाळी पौष्टिक नाश्ता चयापचयसाठी चांगला असतो. जर आपण जिममध्ये जात असाल किंवा व्यायाम करत असाल तर व्यायाम करण्याच्या अर्धा तासापूर्वी आपण हलका आणि पौष्टिक नाश्ता केला पाहिजे, जेणेकरून आपली उर्जा दिवसभर टिकून राहील. या लेखातून आपण अशा पाच ब्रेकफास्टविषयी माहिती जाणून घेऊयात. जे पौष्टिक आणि चवदार असण्याबरोबर प्रोबायोटिकही आहेत.

ढोकळाढोकळा हे असे प्रोबायोटिक फुड आहे जे प्रोटीनने परिपूर्ण आहे. ढोकळा तुम्हाला दिवसभराची एनर्जी देतो. ढोकळा राइबोफ्लेविन, नियासिन, फोलिक अॅसिड, थायमिन, व्हिटॅमिन के और बायोटिन सारख्या पोषक घटकांनी परिपूर्ण आहे. सर्वात जास्त हे पोटासाठी फायदेशीर आहे. हे आंबवून बनवलं जातं. वजन कमी करणारी मंडळी हे नक्कीच खाऊ शकतात. ढोकळा तुमच्या शरीरातील आतील कार्य सुरुळीत करते आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया गतिमान करते. तसेच ढोकळा रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे कारण, त्यात मॅग्नेशियम आहे. तसेच ढोकळ्यात कार्बोहायड्रेट और लो ग्लाइसेमिक इंडेक्स असते जे डायबेटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

दही दही हा भारतीय अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये दही खाऊ शकता. त्यामध्ये असलेले विशेष पौष्टिक पदार्थ प्रत्येक ऋतुमध्ये फायदेशीर ठरतात. त्याच्या वापरामुळे शरीराच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. सहसा सकाळी दही जास्त फायदेशीर असते. हे कोणत्याही स्वरूपात खाणे फायद्याचे आहे. दही प्रोबायोटिक म्हणून वर्गीकृत केले आहे, ज्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. दह्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. जे आरोग्यासाठी तसेच सौंदर्यासाठी देखील फायदेशीर आहे. हे पाचक प्रणाली योग्य ठेवते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, अशा लोकांना दह्याच्या सेवनाचा फायदा होतो.

इडलीइडली प्रामुख्याने तांदूळ आणि उडीद डाळीचा समावेश करून बनवली जाते. त्यामध्ये प्रोटीनचा मुबलक साठा आहे. सोबतच कार्बोहायड्रेट्सचा त्यामध्ये मुबलक साठा आहे. इडलीमध्ये तेलाचा वापर नसतो. त्यामुळे कॅलरीज कमी असतात. फॅट्स आणि कोलेस्टेरॉलही नसल्याने इडली हा एक हेल्दी पर्याय आहे. उडीद डाळीमध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात इडली फायदेशीर ठरते. रक्तदाबाच्या रुग्णांसाठी इडली हा उत्तम नाश्त्याचा पर्याय आहे. त्यामध्ये सोडियमचे प्रमाण अत्यल्प असते. एका इडलीमध्ये सुमारे 65 मिली ग्रॅम सोडियम आढळते. म्हणूनच रक्तदाब आणि हृद्यविकाराच्या रूग्णांसाठी ते फायदेशीर आहे.

लोणचंलोणचे खाण्याचे कित्येक फायदे आहेत. यामुळे व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी आणि प्रोबायोटिक बॅक्टेरिया या घटकांचा शरीराला पुरवठा होतो. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीराची पचन प्रक्रिया मजबूत होते. शरीरास उपयुक्त असणारे व्हिटॅमिन, खनिजांचा पुरवठा होतो. लोणची खाल्ल्यानं पोटामध्ये सूक्ष्म जंतूचा संसर्ग होत नाही.

ताकताक पिण्याचे फायदे अनेक आहेत. शिवाय त्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स, प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला चांगला फायदा होतो. हाडांच्या वाढीसाठी, दातांच्या सुरक्षेसाठी, ह्रदय आणि पोटाच्या आरोग्यासाठी, वजन कमी करण्यासाठी ताक पिणे तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरेल. सकाळी ताक पिण्याचे फायदे अनेक असल्यामुळे तुम्ही सकाळी नाश्त्यासोबत ताक पिऊ शकता.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न