आजकालच्या आहारपद्धतीचा विचार केला तर या पद्धतीत शर्करायुक्त आहार असल्याने स्रायुंची ताकद वाढण्यासाठी अडथळे येतात. थोडक्यात अती हायकार्ब डायट घेतल्याने स्रायूंची वाढ किंवा स्रायूंना पोषक द्रव्य मिळतच नाही. तसा विचार केला तर स्नायूंची ताकद वाढविण्याचे खूप स्रोत आहेत, त्यामध्ये अनुवंशिकता, शारीरिक व्यायाम आणि आहार या गोष्टींचा मुख्यत: समावेश होतो. परंतु स्नायूंच्या बळकटीचा विचार केला तर आहारामध्ये हायप्रोटीन पोषक तत्त्वाचा मुख्य समावेश करणे योग्य असते.मासंपेशीचा विकास करण्यासाठी हाय प्रोटीन आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. तसेच दैनंदिन जीवनात शारीरिक परफॉर्मन्स वाढविण्यासाठी प्रोटीनला महत्त्व आहे. शरीराच्या प्रत्येक भागाचा विकास करण्यासाठी ८० ते ९० टक्के भूमिका प्रोटीन्सची असते.कार्बोहायड्रेटस अपणास शक्ती प्रदान करतात. जेव्हा आपल्या कळत नकळत शरीराची मेहनत किंवा ऊर्जा खर्च होते तेव्हा कार्बोहायड्रेट्स अपणास शक्ती देतात. किंवा ब्लडशुगरच्या प्रमाणात वृद्धी करतात. म्हणून कार्बोहायड्रेटसच्या योग्य सेवनाने शरीरातील आवश्यक चर्बी यात जमा होते.फॅटस हीसुद्धा एक शरीरातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. शरीरातील पोट्रीन्सच्या पचनासाठी फॅट्सचे प्रमाण योग्य असेल तर स्नायूंची ताकद आपोआपच वाढत जाते. त्यामुळे अनावश्यक भूक टाळता येते. तसेच हे विटामिन्स शरीरातील कार्बोहायड्रेट्स जागा भरून काढतात. त्यामुळे ब्लडशुगर लेव्हल आटोक्यात आणत येते.यासाठी डेरी उत्पादक पदार्थ, प्रोटीन शेक्स, कॉटेज चीज इत्यादी गोष्टींचा समावेश आहारात असणे आवश्यक असते.शरीरातील प्रोटिनचे स्थानशरीरामध्ये प्रोटीनची भूमिका अत्यंत आवश्यक आहे. कारण हायप्रोटीन हे मांसपेशीला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात. प्रोटीनयुक्त अन्न, आणि योग्य कार्बोहायड्रेट्स शरीराला व्यायाम करण्यासाठी शक्ती प्रदान करतात. त्याचप्रमाणे शरीरातील मांसपेशी मजबूत करण्यासाठी अनावश्यक चरबी घटवण्यासाठी आवश्यक ठरतात. यामध्ये मुख्यत: प्रोटीन्स, भाज्या, कार्बोहायड्रेटस हे प्रमाणात घेणे, भाज्या आणि फळांमधून विटामिन आणि खनिज पदार्थ असतात, जे आपली भूक कंट्रोलमध्ये ठेवतात. काही लोकांना या आहाराची सवय नसते. कारण त्यांना या शरीरातील घडामोडींची माहिती नसते. त्यामुळे बहुतांशी लोक असे आहार घेत नाहीत; पण स्नायूंच्या योग्य वाढीसाठी तीन महत्त्वपूर्ण घटक आहेत.स्नायुंची मजबुती ही आपल्या आहारातून घेतलेल्या योग्य प्रोटीनच्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यासाठी आहारामध्ये पोषक तत्त्वांचा समावेश असणे अत्यंत आवश्यक असते. दुसरी गोष्ट शरीराच्या आवश्यक पोषकद्रव्यांची भरपाई करत असताना व्यायाम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मग त्यामध्ये व्यायामाच्या आधी व नंतर घेण्याच्या आहाराच्या पद्धतीवर कटाक्ष टाकणे गरजेचे असते.व्यायामामध्ये लागणारी उर्जा ही आपल्या दैनंदिन आहारातील पोषक द्रव्यावरती निर्भर असते.स्वाती पारधी, swatipardhi23@gmail.com
(लेखिका प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आहेत.)