नसबंदी करून घेणार्या पुरुषांच्या संख्येत वाढ
By admin | Published: April 25, 2016 12:27 AM
पुणे : मुले झाली की नसबंदीची शस्त्रक्रिया स्त्रीने करून घ्यायची अशी आतापर्यंतची सामाजिक मानसिकता होती. मात्र आता हे चित्र पालटत असल्याचे राज्याच्या पुरुष नसबंदीच्या आकडेवारीवरून दिसत आहे. गेल्या 5 वर्षांत पुरुष नसबंदीचे प्रमाण 34 टक्क्यांवरून 65 टक्क्यांवर आले आहे.
पुणे : मुले झाली की नसबंदीची शस्त्रक्रिया स्त्रीने करून घ्यायची अशी आतापर्यंतची सामाजिक मानसिकता होती. मात्र आता हे चित्र पालटत असल्याचे राज्याच्या पुरुष नसबंदीच्या आकडेवारीवरून दिसत आहे. गेल्या 5 वर्षांत पुरुष नसबंदीचे प्रमाण 34 टक्क्यांवरून 65 टक्क्यांवर आले आहे.पुरुष नसबंदीबाबत जागरुकतेसाठी राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. एन. डी. देशमुख यांनी सांगितले. यासाठी ग्रामीण व शहरी भागात पुरुषांचे समुपदेशन वर्ग तसेच कार्यशाळा घेण्यात येत आहेत. मात्र शहरी व ग्रामीण भागापेक्षा आदिवासी भागात पुरुष मोठय़ा संख्येने नसबंदी शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेत असल्याचेही डॉ. देशमुख म्हणाले. ----------------------------------------गैरसमज दूर करा1. स्त्री नसबंदीपेक्षा पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया कित्येक पटींनी सोपी असते. 2. यासाठी पुरुषाला दवाखान्यात भरती होण्याची आवश्यकता नसते. केवळ 3 मिनिटांत ही शस्त्रक्रिया केली जाते. 3. पुरुषाला कोणतीही जखम होत नाही व टाकेही घालावे लागत नाहीत. 4. वैवाहिक सुख पूर्वीप्रमाणेच मिळते. 5.अर्थिक लाभ 1451 रुपये मिळतो.--------------दूरदर्शन, नभोवाणी, पत्रके अशा माध्यमांतून पुरुष नसबंदीबाबत जागृती करण्यात येत आहे. नसबंदीसाठी राज्यातील पुरुषांची वाढती संख्या हे या मोहिमेचे यश आहे.-डॉ. एन. डी. देशमुख, साहाय्यक संचालक, कुटुंबकल्याण(पुरुष)--