फर्टिलिटीवर करण्यात आलेल्या नवीन अभ्यासात कोरोना माहामारीच्या काळात असलेल्या झिंक सप्लिमेंटबाबत माहिती देण्यात आली आहे. या अभ्यानुसार जे लोक सध्याच्या घडीला कुटुंब नियोजन करत आहेत. त्यांनी आपल्या आहारात झिंकचे प्रमाण वाढवायला हवे. झिंकमुळे स्पर्म सेल्स आणि एग्समधील मायटोकॉन्ड्रियल नुकसानापासून बचाव करता येतो.
हा अभ्यास रिप्रोडक्टिव्ह सायंसेज जर्नलमध्ये छापण्यात आला आहे. मागच्या काही अभ्यांसानुसार कोरोना व्हायरसचा परिणाम महिला आणि पुरूषांच्या फर्टिलिटीवर होताना दिसून येत आहे. या अभ्यासातून कोरोनाच्या दुष्परिणामांचा सामना कशाप्रकारे करता येऊ शकतो याबाबत माहिती देण्यात आली होती.
हा अभ्यास अमेरिकेच्या वेन स्टेट युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार झिंक फक्त फर्टिलिटीच वाढवत नाही तर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठीही फायदेशीर ठरतो. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार माहामारीच्या काळात जे लोक फॅमिली प्लॅनिंग करत आहेत. ज्यांनी झिंक सप्लिमेंट्स घ्यायला हव्यात. संशोधकांनी सगळ्याच वयस्कर लोकांना दिवसातून कमीत कमी ५० MG झिंक सप्लिमेंट घेण्याबाबत सांगितले आहे. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढून व्हायरसशी लढण्यास मदत मिळते.
संशोधकांना दिसून आले की. शरीरांत जिंकचे प्रमाण कमी असल्यामुळे सायटोकाईन स्टॉर्मचा प्रतिसाद वाढतो. त्यामुळे इन्फेमेश, टिश्यूंना नुकसान किंवा ऑर्गन फेल्यूअरची समस्या उद्भवते. यामुळे इमॅच्यूअर एग्स आणि स्पर्म्समध्ये मायटोकॉन्ड्रियल क्षतिग्रस्त झाल्यानं रिप्रोडक्शन आणि फर्टिलायलेशन रोखलं जातं. त्यामुळे गरोदर राहण्यास अडथळे येऊ शकतात.
या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉकर अबू सऊद यांनी सांगितले की, '' झिंक एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटीइंफ्लेमेटरी एजेंटच्या रुपात काम करतात. त्यामुळे स्पर्म्स सेल्स आणि व्हायरसचं होणारं नुकसान टाळता येऊ शकतं. इतकंच नाही तर झिंकमुळे गरोदरपणातील समस्या दूर होतात.'' coronavirus: अखेर कोरोनाविरोधात रामबाण उपाय सापडला, असं होणार विषाणूचं काम तमाम
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमित व्यक्तीला सायटोकिन स्टॉर्म वाढण्यााधी झिंक सप्लीमेंट देण्यात आली तर गंभीर स्थिती ओढावण्यापासून वाचता येऊ शकतं. शरीरात झिंकचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात तुम्ही चिकन, अंडी, बीया, राजमा, काजू, बदाम, डाळिंब, किवी, एवोकाडो अशा पदार्थांचा वापर करू शकता. सायलेंट हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतात ही लक्षणं; घाबरण्याआधीच जाणून घ्या महत्वाच्या टिप्स