मुंबई : रात्रंदिवस घर आणि नोकरीचा तोल सांभाळून राबणाºया महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्यात पाठदुखीचे प्रमाण वाढल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. महिलांना होणाºया पाठदुखीकडे त्या कायम दुर्लक्ष करत असतात, त्यामुळे पाठीचे आणि पाठीच्या मणक्याचे दुखणे गंभीर वळणावर आल्यावर उपचार सुरू केल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.मुंबईतील एका सुप्रसिद्ध रुग्णालयातील आॅर्थोपेडिक डॉक्टरांनी हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार, सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे महिला पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात दुखण्याकडे लक्ष न देता शस्त्रक्रियेची वेळ येईपर्यंत लांबवितात. तर पुरुष दुखणे कमी प्रमाणात सहन करतात, ९० टक्के पुरुष ५ वर्षांपेक्षा कमी काळ त्रास सहन करतात. महिलांच्या तुलनेत पुरुषांना पाठीची दुखणी उशिरा सुरू होतात. प्रसूती झाल्यावर किंवा गर्भारपणात सर्वात जास्त ताण हा पाठीवर येतो. पाठीच्या मणक्यात बहुतेक वेळेस चमक किंवा अचानकच पाठीत जोरात दुखू लागते. अतिरिक्त कामाचा ताण, प्रत्येक गोष्टीत धावपळ यामुळे दुखणे बळावते. सतत काम करत राहिल्यामुळे, वाकल्यामुळे किंवा जास्त वेळ बसल्यामुळे पाठीची हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे उठायचा, वाकायचा त्रास उद्भवतो. त्यामुळे प्राथमिक दुखणे असताना महिलांना उपचार घेणे जरुरीचे असल्याचे दिसून आले आहे.महिलांवर जबाबदाºयांचे जास्त ओझे असल्याने अनेकदा समतोल राखताना त्यांना आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. बºयाचदा महिला छोट्या-छोट्या आरोग्य तक्रारींकडे लक्ष देत नाहीत. मात्र याच तक्रारी भविष्यात मोठ्या आजारांना निमंत्रण देतात, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. पाठीच्या कण्याचा त्रास, डी जीवनसत्वाचा अभाव, कॅल्शियमचा अभाव, खाण्याच्या चुकीच्या सवयी, काळजी न घेणे आणि व्यायाम न करणे या सवयी घातक आहेत. म्हणून महिलांनी वेळीच उपचार करून घेणे अत्यावश्यक आहे.- डॉ. विशाल पेशट्टीवावरपाठदुखीची कारणेखुर्चीत बसताना शरीराचे वजन पाठीवर येते. कंबरेत वाकून बसण्याची सवय असल्यास किंवा खुर्ची योग्य नसल्यास पाठदुखी नक्की होते.दुचाकी चालवताना पाठीला कोणताही आधार नसतो. रोज लांबचा प्रवास करणाºया तसेच खड्डे असलेल्या रस्त्यांवरून गाडी हाकणाºयांना हमखास पाठदुखी सतावते.वाकून उभे राहण्याची सवय पाठदुखीला निमंत्रण देते.अयोग्यपणे जड वस्तू उचलल्याने, ढोपरात न वाकता वस्तू उचलल्यामुळे, पाठीवर भार आल्याने.अयोग्य गादीवर आखडलेल्या स्थितीत झोपल्याने पाठदुखी होते.उपायवस्तू उचलताना गुडघ्यात वाका, पाठ सरळ ठेवा व वस्तू शरीराजवळून उचला.एकाच स्थितीत बराच वेळ बसू नका. नियमित वेळाने बसण्याची स्थिती बदला, पाठ सरळ करा किंवा फिरून या.टेबलावर कोपर ९० अंशांमध्ये टेकतील, अशा प्रकारे खुर्चीची उंची ठेवा, गाडी चालवताना पाठीला आधार मिळेल याप्रकारे सीट ठेवा.झोपताना पाठीला आधार मिळेल अशा टणक पृष्ठभागावर झोपा.आखडलेल्या स्थितीत झोपू नका. कुशीवर झोपताना कंबरेलाआधार मिळेल, अशा पद्धतीने पातळ उशीचा उपयोग करा, पाठदुखी असेल तर उंच टाचांच्या चपला टाळा.सर्वेक्षणानुसार, सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे महिला पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात दुखण्याकडे लक्ष न देता शस्त्रक्रियेची वेळ येईपर्यंत लांबवितात. तर पुरुष दुखणे कमी प्रमाणात सहन करतात, ९० टक्के पुरुष ५ वर्षांपेक्षा कमी काळ त्रास सहन करतात. महिलांच्या तुलनेत पुरुषांना पाठीची दुखणी उशिरा सुरू होतात.
महिलांमध्ये वाढतेय पाठीचे दुखणे, सर्वेक्षणातील अहवाल : गंभीर होण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 7:17 AM