शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

दिलासादायक! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला वेगळं करणारा भारत जगातील पहिला देश; : ICMR

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2021 9:31 AM

CoronaVirus News & Latest updates : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) ने शनिवारी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

कोरोनाच्या माहामारीत काही दिवसांपूर्वी पसरलेल्या नव्या स्ट्रेनमुळे पुन्हा चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. कारण कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन अधिक संक्रामक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात होते.  भारताने ब्रिटनमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर माहिती मिळवण्याबाबत मोठं यश मिळवलं आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) ने शनिवारी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

आयसीएमआरने ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये समोर आलेला कोरोना व्हायरसच्या नवीन  स्ट्रेनवर भारतानं यशस्वीरित्या कल्चर केले आहे. कल्चर एक अशी प्रक्रिया आहे. ज्यात पेशींना नियंत्रित स्थितीत वाढवलं जातं. साधारणपणे त्यांच्या प्राकृतीक वातावरणासाठी बाहेर अशी स्थिती निर्माण केली जाते. आयसीएमने दिलेल्या माहितीनुसार जगभरातील इतर देशांपैकी भारताला सगळ्यात आधी ही माहिती मिळवण्यात यश मिळवलं आहे.

आयसीएमआरने आपल्या ट्विटमध्ये दावा केला आहे की,  कोणत्याही देशानं ब्रिटनमध्ये सापडून आलेल्या नवीन कोरोना स्ट्रेनचे विश्लेषण केलेले नाही. ब्रिटनमध्ये समोर आलेल्या व्हायरसच्या प्रकारांना राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थान (NIV)ने यशस्वीरित्या वेगळं करून विश्लेषण केलं आहे. या प्रक्रियेसाठी ब्रिटनवरून आलेल्या लोकांमधून नमूने एकत्र करण्यात आले होते. 

भारतात कोरोना व्हायरसनं २९ लोक संक्रमित

कोरोनाचा नवीन स्ट्रेन ७० टक्के अधिक संक्रामक असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे आतापर्यंत २९ लोकांना संक्रमित केलं असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान नव्या स्ट्रेनच्या तुलनेत कोविडचा जुना स्ट्रेन जास्त धोकादायक आहे. ज्यात सर्वात जास्त जीव गेले आहेत. एका रिसर्चमधून याचा खुलासा झाला आहे. काळजी वाढली! हिवाळ्यात दारूचं सेवन ठरू शकतं जीवघेणं; हवामान विभागाचा धोक्याचा इशारा

ब्रिटनमध्ये पब्लिक हेल्थ एजन्सी द्वारे करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये आढळून आले की, जुन्या स्ट्रेन जास्तीत जास्त रूग्णांना भरती तर करावंच लागलं, सोबतच जुन्या स्ट्रेनने मृत्यूही जास्त झालेत. त्यामुळे एक्सपर्टचं असं मत आहे की, नव्या स्ट्रेनबाबत टेंशन घेण्याचं काहीच कारण नाही. हा भलेही जुन्या स्ट्रेनच्या तुलनेत अधिक वेगाने संक्रामक आहे. पण जीवघेणा नाही. आधीपेक्षा जास्त जीवघेणा ठरणार कोरोनाचा नवा स्ट्रेन? संशोधनातून समोर आली महत्वाची माहिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य