भारतीय औषधांच्या कंपनीवर अमेरिकेत ३६४ कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. अमेरिकच्या न्याय विभागानं दिलेल्या माहितीनुसार resenius Kabi Oncology Limited (FKOL) कंपनीने माहिती लपवल्याबाबत तसंच रेकॉर्ड मिटवल्याच्या प्रकरणाचा स्वीकार केला आहे. कंपनीवर आरोप लावण्यात आला होता की, अमेरिकेच्या फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशनची (FDA) टीम चाचणीसाठी २०१३ मध्ये कंपनीच्या प्लाटंमध्ये गेली होती. त्याच्या आधीच हे रेकॉर्ड नष्ट करण्यात आले आहेत.
अमेरिकेतील न्याय विभागानं दिलेल्या माहितीनुसार कंपनीने ही चूक स्वीकारल्यानंतर ३६४ कोटी रुपयांचा दंड भरण्याचंही मान्य केलं आहे. अमेरिकेच्या फेडरल कोर्टात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. resenius Kabi Oncology Limited (FKOL) कंपनीवर फेडरल फूड, ड्रग एंड कॉस्मेटिक्स कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला होता.
अमेरिकेतील न्याय विभागानं दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन ग्राहकांसाठी वापरात असलेल्या औषधाची तपासणी केली जाते. त्याचवेळी एफडएपासून ही माहिती लपवण्यात आली होती तसंच रेकॉर्ड डिलीट करण्यात आले होते. यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात असल्याचे सांगितले जात आहे. कोर्टाच्या माहितीनुसार ही कंपनी पश्चिम बंगालच्या कल्यानीमध्ये औषधांचे उत्पादन करणारी कंपनी आहे. ही कंपनी कॅन्सरच्या रुग्णांसाठी औषध आणि इतर सामान तयार करते. सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होत नाही? मग गॅस, पोटदुखीची चिंता सोडा, या उपायांनी समस्या होईल दूर
अमेरिकेनं कंपनीवर लावलेल्या आरोपांनुसार एफडीएचा मॅनेजमेंट स्टाफ पोहोचण्याआधीच काही रेकॉर्ड मिटवले आणि काही पुरावे नाहिसे केले होते. यावरून असं दिसून आलं की FDA च्या नियमांविरुद्ध या कंपनीमध्ये औषधांचे उत्पादन केले जात होते.
अमेरिकन न्याय विभागाच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार FKOL कंपनीने स्टाफ कंप्यूटरकडून संपूर्ण डाटा डिलीट केला होता. याशिवाय अनेक कागदपत्रांची हार्ड कॉपीसुद्धा नष्ट केली. अमेरिकन सरकारनं दिलेल्या माहितीनुसार FDA च्या नियमांचे उल्लंघन करत असलेल्या कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे. सावधान! 'या' ५ सवयींमुळे वेळेआधीच येऊ शकतं म्हातारपण; आजच बदला चुकीच्या सवयी