शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

प्रोटीनबाबत भारतीयांमध्ये संभ्रम, 93 टक्के जनता फायद्यापासून अनभिज्ञ- रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 5:20 PM

आयर्न आणि कॅल्शियमप्रमाणेच भारतीयांमध्ये प्रोटीनचीसुद्धा कमतरता असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

आयर्न आणि कॅल्शियमप्रमाणेच भारतीयांमध्ये प्रोटीनचीसुद्धा कमतरता असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. शहरातल्या 73 टक्के लोकसंख्येमध्ये प्रोटीनचा स्तर ठरावीक प्रमाणापेक्षा कमी असल्याचं आढळलं. तसेच जेवणात त्याचा का समावेश करावा, यासंदर्भात 93 टक्के लोक हे अनभिज्ञ आहेत. भारतीय लोक प्रोटीनला फार महत्त्व देत नाहीत. ते फक्त व्यायामशाळेत जाणाऱ्यांसाठी गरजेचं असल्याचाही एक मतप्रवाह आहे. इंडियन मार्केट रिसर्च ब्यूरोच्या सर्व्हेतून ही बाब समोर आलेली आहे.  रिपोर्टनुसार, देशातल्या 7 प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्व्हेतून असं समोर आलं आहे की, डाएट प्रोटीनचा वापर वजन कमी करण्यासाठी होतो. 2018मध्ये इनबॉडी-आयपीएसओएसच्या सर्व्हेनुसार, 71 टक्के भारतीयांचे स्नायू कमकुवत असतात. त्यांच्या शरीरात 68% प्रोटीनची कमतरता असते, असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातल्या जनतेमध्ये 56.5 ग्राम आणि शहरी भागातल्या भारतीयांमध्ये 55.7 ग्राम प्रोटीनचा अभाव असतो. 

इंडियन मार्केट रिसर्च ब्यूरोच्या दुसऱ्या एका सर्व्हेतून देशातल्या प्रमुख शहरातील लोकांमध्ये प्रोटीनचा स्तर जास्त आहे. 90 टक्के लखनऊच्या लोकांमध्ये प्रोटीनचा स्तर तपासण्यात आलेला आहे. सर्वेक्षणातून लखनऊच्या 90 टक्के लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता असल्याचं समोर आलं आहे. अहमदाबाद आणि चेन्नईतली 84 टक्के जनतेमध्ये प्रोटीनची कमी जाणवली आहे. तर तिसऱ्या स्थानी विजयवाडा (72%) आणि मुंबई (70%) आहे. दिल्लीत हा आकडा 60 टक्क्यांवर आहे. या सर्व्हेत 1800 लोकांचा समावेश करण्यात आलेला असून, त्यांच्या जेवणा-खाण्याच्या पद्धतीचं विश्लेषण करण्यात आलं आहे.    

इंडियन डायटिक असोसिएशननुसार, भारतीयांच्या खानपानाच्या गरजेच्या मात्रेनुसार 50 टक्के प्रोटीन मिळतं. प्रोटीन मुलांना विकासाशिवाय त्यांच्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेत वाढ करते. स्नायूंसाठी हे जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच शरीरातील रोगांशी लढण्याची क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच त्वचा आणि केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी शरीरात पर्याप्त प्रोटीन असणं आवश्यक आहे.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य