शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! सभागृहात शिवीगाळ करणे भोवले; अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित
2
“हीच वेळ आहे, आम्ही गेल्यावर तुम्ही एकत्र येणार का”; मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना सवाल
3
BREAKING : टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा! BCCI ने अचानक संघ बदलला; तिघांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी
4
ऑल टाईम हाय नंतर Nifty, Sensex झाले रेंज बाऊंड; IT शेअर्स चमकले, Airtelमध्ये प्रॉफिट बुकिंग
5
राहुल गांधींच्या 'हिंदूं'वरील वक्तव्याने वाद; BJP खासदार बन्सुरी स्वराज यांनी बजावली नोटीस...
6
'सरकारला सत्य सहन होत नाही', भाषणातील काही भाग काढून टाकल्याने मल्लिकार्जुन खर्गे संतापले
7
"...तेव्हा का सूचलं नाही?", अंबादास दानवेंच्या निलंबनाची मागणी करताच संतापल्या सुषमा अंधारे! 
8
भाषणातून हटवलेले शब्द पाहून राहुल गांधी संतापले; सभापतींना पत्र लिहून सांगितले नियम
9
नेपाळच्याही संघात बाबर आझमला संधी मिळणार नाही; शोएब मलिकची सडकून टीका
10
राहुल गांधींच्या संसदेतील भाषणावर कंगना राणौत संतापली, म्हणाली - 'चांगलं स्टँडअप कॉमेडी होतं'
11
“भाजपाच्या टोळ्यांना असेच उत्तर दिले पाहिजे”; संजय राऊतांनी केली अंबादास दानवेंची पाठराखण
12
तो चेंडू रोहितकडे फेकणार होतो, पण...; त्या झेलवरील वादावर सूर्याचा मोठा गौप्यस्फोट
13
काँग्रेसवर हल्लाबोल, खासदारांना कानमंत्र..., NDA च्या बैठकीत PM नरेंद्र मोदी काय म्हणाले?
14
‘होई वही जो राम रचि राखा’, अयोध्येतील पराभवावरून अखिलेश यादवांचा भाजपा टोला
15
HDFCच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 'या' दिवशी UPI चालणार नाही, बॅलन्ससह 'या' सेवाही वापरता येणार नाहीत
16
"मनोज जरांगे-पाटील यांच्या घराची कोण टेहळणी करतंय? त्यांना संरक्षण द्या’’, विजय वडेट्टीवार यांची मागणी 
17
Ramdas Athawale : "राहुल गांधी हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत, काँग्रेसच दहशतवादी"; रामदास आठवलेंचा आरोप
18
"तेव्हा मी रात्रभर ढसढसा रडत होतो..."; गौतम गंभीरने सांगितला 'टीम इंडिया'बद्दलचा किस्सा 
19
चंद्र-मंगळ युती: ६ राशींवर महालक्ष्मीची असीम कृपा, परदेशी वारीचा योग, पद-प्रतिष्ठा वाढेल!

​देशातील पहिली गर्भाशय ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पुण्यात यशस्वी !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2017 11:21 AM

अशी शस्त्रक्रिया देशातील पहिलीच असल्याने त्याकडे वैद्यकीय जगतासह सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.

सोलापुरातील २१ वर्षीय तरुणीच्या शरीरात तिच्याच आईचे गर्भाशय ट्रान्सप्लांट करण्याची शस्त्रक्रिया पुण्यात यशस्वी झाली. अशी शस्त्रक्रिया देशातील पहिलीच असल्याने त्याकडे वैद्यकीय जगतासह सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. ‘पुण्यातील गॅलेक्सी केअर लेप्रोस्कोपी इन्स्टिट्यूट’ या हॉस्पिटलमध्ये ही गर्भाशय ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. या ट्रान्सप्लांटमुळे महिलेला स्वत:चे बाळ जन्माला घालणे शक्य होणार आहे. या हॉस्पिटलमध्ये तीन महिलांमध्ये गर्भाशयाचे ट्रान्सप्लांट करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिली शस्त्रक्रिया पार पडली आहे. या प्रक्रिया शेवटपर्यंत यशस्वी झाल्यास आईने दान केलेल्या गर्भाशयामुळे मुलीला स्वत:चे बाळ जन्माला घालता येणार आहे. सध्या ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली, तरी तीन आठवड्यानंतरच त्याची यशस्वीतता खऱ्या अर्थाने समजू शकेल, अशी माहिती ‘गॅलेक्सी केअर लेप्रोस्कोपी इन्स्टिट्यूट’ हॉस्पिटलने दिली आहे.गर्भाशयाचे प्रत्यारोपण करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकातील डॉ. शैलेश पुणतांबेकर, डॉ. पंकज कुलकर्णी आणि डॉ. मिलिंद तेलंग यांनी स्वीडनला जाऊन गर्भाशयाच्या ट्रान्सप्लांटची माहिती घेतली होती. डॉ. पुणतांबेकर यांनी जर्मनीत जाऊन ट्रान्सप्लांटचे प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणात ट्रान्सप्लांटच्या नियमांची माहिती, पेशंटची निवड व प्रत्यक्ष प्रक्रिया आदीचा समावेश होता. स्वीडनमध्ये ओपन सर्जरी करण्यात आली होती. पुण्यात दात्याचे गर्भाशय हे दुर्बिणीद्वारे काढण्यात येणार होते.शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असली तरी दाता आणि संबंधित युवती यांना पुढील दोन दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात येईल. त्यानंतर तीन आठवडे त्यांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल. तीन आठवड्यांनंतर गर्भाशयाचे कार्य आणि रक्तपुरवठा यावरच त्याची यशस्वीतता अवलंबून असल्याचे सांगण्यात येत आहे.