फिटनेस राखण्याचा मजेशीर उपाय : झुंबा !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 12:28 PM
रोज एकाच प्रकारचा व्यायाम करणे तुम्हांला कंटाळवाणे वाटत असेल तर इतरही काही मजेशीर प्रकारांमधून तुम्ही तुमचा फिटनेस मेन्टेंट ठेऊ शकता. ‘झुंबा’ हा असाच एक मजेशीर वर्कआऊट प्रकार.
बदलत्या जीवनशैलीनुसार आज लहानांपासून ते वृद्धांपासून सर्वांचे जीवन तणावग्रस्त आणि धावपळीचे झाले आहे. अशावेळी स्वत:च्या फिटनेसकडे आवर्जून लक्ष देण्यासाठी जिम, योगा, ध्यान यांची मदत घेतली जाते. मात्र रटाळ आणि रोज एकाच प्रकारचा व्यायाम करणे तुम्हांला कंटाळवाणे वाटत असेल तर इतरही काही मजेशीर प्रकारांमधून तुम्ही तुमचा फिटनेस मेन्टेंट ठेऊ शकता. ‘झुंबा’ हा असाच एक मजेशीर वर्कआऊट प्रकार.झुंबा हा एक प्रकारचा कार्डिया वर्कआऊट आहे. जीममधल्या एकाच प्रकारच्या व्यायाम प्रकाराने लोकं कंटाळली आहेत. पण ‘झुंबा’ हा आधुनिक युगातील एक मजेशीर वर्कआऊट प्रकार आहे. यामध्ये विशिष्ट प्रकारच्या संगीतामध्ये ४०-४५ मिनिटं तुम्ही सतत मुव्हमेंट करत असता. यावेळी तुमच्याही नकळत आणि आनंद घेताघेता कॅलरीज बर्न होत असतात. वर्क आऊट करताना तुमचा हार्ट रेटही सुधारतोय. त्यामुळे रटाळ व्यायामप्रकारांऐवजी मजा करत फिटनेस मेंटेंन्ट करणं लोकांना अधिक सोयिस्कर वाटतय म्हणून ते कमीत कमी वेळात अधिक पॉप्युलर होतयं. झुंबा हा ‘फन वर्कआऊट’ आहे. त्यामुळे नक्कीच केवळ विशिष्ट समस्येशी ते सीमीत नसते. सकाळपासून कामाला सुरवात झाली की संध्याकाळपर्यंत सहाजिकच आपण मानसिक किंवा शारिरीकरित्या थकतो. अशावेळी झुंबा सारखी ग्रुप अॅक्टिव्हिटी करताना तुम्ही अनेकांना भेटता. यामुळे ताण-तणाव हलका होतो. तसेच ड्रीप्रेशन सारख्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या समस्यांदेखील दूर होतात. झुंबा हा कार्डिया वर्कआऊट असल्याने शरीरातील कॅलरीज कमी होतात. त्यामुळे वजन आटोक्यात राहते. तसेच बारीक असणाऱ्यांसाठी ‘झुंबा टोनिंग’ या प्रकारामुळे शरीर टोन मध्ये ठेवण्यास मदत होते.व्यायाम किंवा फिटनेस हा साऱ्याच वयातील लोकांना आवश्यक असतो. मग झुंबासाठी वयाचे बंधन नाही. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सारेच ‘झुंबा’ करू शकतात. त्याला वयाचं बंधन नाही. परंतू तुमच्या शारीरिक व्याधीनुसार त्याची तीव्रता आणि प्रकार तुम्ही निवडू शकता. हा केवळ एक गैरसमज आहे. एखाद्या पार्टीमध्ये आपण जसे ‘मनसोक्त’ आणि बिनधास्त नाचतो. तसेच ‘झुंबा’ करतानादेखील तुम्हांला डान्स करता येतो की नाही. हे बंधन मूळीच येत नाही.जसे झुंबाला वयाचं बंधन नसतं तसंच व्याधींचं बंधन नसतं. पण शारिरीक अवस्थेनुसार झुंमा ट्रेनर गरोदर स्त्रियांना योग्य प्रकार सुचवतात. त्यामुळे गरोदरपणात आणि त्यानंतरही वजन आटोक्यात ठेवण्यासाठी ‘झुंबा’ अगदी फायदेशीर आहे. बेली डान्सदेखील गर्भारपणानंतर वजन घटवण्याचा हेल्दी उपाय आहे.