शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चॉकलेट आणि चीज योग्य प्रमाणात घेतल्यास कमी होतो हृदयरोगाचा धोका; इटलीच्या संशोधकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 3:10 PM

संशोधनकांनी हृदयाच्या आरोग्यासाठी चॉकलेट, चीज आणि योगर्ट यांचा योग्य प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. हा दावा इटलीच्या नेपल्स यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे.

हृदयाचे (heart)आरोग्य जपण्यासाठी डॉक्टर व्यायामासोबतच हेल्दी डाएटचा (healthy diet) सल्ला देतात. दरम्यान, संशोधनकांनी हृदयाच्या आरोग्यासाठी चॉकलेट, चीज आणि योगर्ट यांचा योग्य प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. हा दावा इटलीच्या नेपल्स यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. संशोधकांचे म्हणने आहे की दररोज तुम्ही जर २०० ग्रॅम डेरी प्रोडक्ट घेतले तर यामुळे हृदयाला काहीही अपाय होत नाही. जर तुम्हाला चीज खायला आवडत असेल तर एक तृतियांश कप चीज खाऊ शकता. ५० ग्रॅम चीज खाल्ल्याने हृदय हेल्दी राहते.

संशोधकांचे असेही म्हणणे आहे की चॉकलेटचे जर एका विशिष्ट प्रमाणात सेवन केले तर हृदयरोगाचा धोका कमी होतो. तुम्ही २द ते ४५ ग्रॅम चॉकलेट खाल्ले तर फायदा होतो. डार्क चॉकलेटमधील फ्लेवेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स हदयाचे स्वास्थ्य चांगले ठेवतात. हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी दोन उपाय जे तुम्ही करू शकता.

१. उत्तम आहार: पालेभाज्यांमुळे १६ टक्के आणि तृणधान्यांमुळे  २२ टक्के धोका कमी.नॅशनल इस्टिट्युट ऑफ मेडिसिनच्या नुसार पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन के आणि नायट्रेट्स असतात. जे रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत करतात आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतात. जेवणात पालेभाज्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे हृदयासंबधित आजारांचा धोका १६ टक्क्यांपर्यंत कमी होतो.  तृणधान्यांमध्ये फायबर असते जे बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते. दररोज जर १५० ग्रॅम तृणधान्यांचे सेवन केले तर धोका २२ टक्क्यांनी कमी होतो.

२. एक्सरसाईज : ब्लड सर्क्युलेशन वाढवते आणि कॉलेस्ट्रॉल कमी करते.

रेझिस्टंन्स ट्रेनिंग अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिच्या मते, आठवड्यातून कमीत कमी सलग दोन दिवस रेझिस्टंन्स ट्रेनिंग जसे वेट उचलणे, रेझिस्टंन्स बँड ने किंवा बॉडी वेट एक्सरसाईजने पुशअप, चीनअप ने बॅली फॅट आणि बॉडी फॅट कमी होते. हे फॅट्स हृदयरोगाला कारणीभूत असतात. तसेच कॉलेस्ट्रॉलही कमी होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स