International Yoga Day 2017 : मेंदू आणि शरीराच्या एकतेचे प्रतिक, योगा !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2017 1:05 PM
योग भारताची प्राचीन परंपरेची एक अमुल्य देण आहे. योगा मेंदू आणि शरीराच्या एकतेचे प्रतिक आहे.
-Ravindra Moreसंयुक्त राष्ट्र महासभेत मंजुर झालेल्या ठरावानुसार २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून ओळखला जातो. भारताच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिनाचा प्रस्ताव महासभेत मांडला होता. नेपाळ, अमेरिका, चीनसह जगातील १९३ देशांच्या पाठिंब्यामुळे ११ डिसेंबर २०१४ रोजी हा प्रस्ताव सहज मंजुर झाला. योग भारताची प्राचीन परंपरेची एक अमुल्य देण आहे. योगा मेंदू आणि शरीराच्या एकतेचे प्रतिक आहे, मनुष्य आणि निसर्गादरम्यान सामंजस्य आहे. विचार, संयम आणि स्फुर्ती देणारा तथा आरोग्य आणि सकारात्मकतेसाठी एक सक्षम दृष्टिकोनदेखील योगामुळेच मिळतो. आनंदी जीवन जगण्यासाठी योगा..आजच्या या धावपळीच्या युगात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे प्रत्येकजण विविध प्रकारच्या व्याधीने त्रस्त आहेत. याकरिता आनंदी जीवन जगण्यासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे. योगामुळे मानवाच्या सवार्गीण व्यक्तिमत्वाचा विकास होतो. जीवन आनंदी, उत्साही व निरोगी ठेवण्यासाठी योगाची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे सेलिब्रेटी सुद्धा योगाच्या वगार्ला दररोज वेळ काढतात. योगा हा आजघडीला कसा आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. योगाचे फायदे * उत्तम आरोग्य : केवळ तुमचे शरीर निरोगी असून, चालत नाही. त्याकरिता मानसीक व भावीनक आरोग्यही उत्तम असणे आवश्यक आहे. जीवनात आनंद व उत्साह असला तरच तुम्हाला कोणतेही यश संपादन करता येते. त्याकरिता प्राणायम, ध्यान व धारणा या गोष्टी कराव्यात. त्यामुळे मन सुद्धा शांत राहते. * वजन कमी करण्यासाठी : दररोज नियमीत योगाचा सराव केला तर वजन हे हमखास कमी होते. तसेच आपल्या शरीराला कधी व कोणत्या अन्नाची गरज आहे. याची सुद्धा यामुळे जाणीव निर्माण होते. * तणावमुक्ती : दररोजचा ताण तणाव घालविण्यासाठी योगासने, प्राणायम, व ध्यान धारण ही तणाव नष्ट करणारी महत्वाची तंत्रे आहेत. त्याकरिता नियमीत योगाचा सराव करणे आवश्यक आहे. * शांतता : मनाला शांती मिळण्यासाठी दररोजच्या कामातून वेळ काढावा. सुटीमध्ये दररोज योग व ध्यान केल्याने, मनाला एकदम शांती मिळते. त्या शांतीमुळे आपल्याला विविध प्रकारचे फायदे होतात. तसेच अस्वस्थ झालेल्या मनाला काबूत आणण्यासाठी योगासारखा दुसरा पर्याय नाही. * रोगप्रतिकारक शक्ती वाढते : योगा केल्यामुळे आपल्या शरीरातील स्नायू हे बळकट होतात. त्यामुळे शरीरातील ताण तणाव निघून जाऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. * सजगतेत वाढ : आपले मन हे नेहमी भूतकाळ किंवा भविष्याकाळात असते. या विचाराने सध्या काय सुरू आहे, हे सुद्धा अनेकजण विसरुन जातात. आपण जर नियमीत योगा व प्राणायम करीत असाल तर आपल्या सजगतेत वाढ होते. तसेच आनंदी राहून मनाची एकाग्रताही वाढते. * नात्यात सुधारणा : तुमचे घरात आई वडिल, पत्नी, बाहेर मित्र यांच्यासोबत नेहमी खटके उडत असेल तर ते योगामुळे सुधारतात. मन हे शांत असल्याने सर्वांसोबत तुमचे संबंध चांगले प्रस्थापित होऊन, नात्यात सुधारणा होते. * उत्साह वाढतो : दिवसभर कामाच्या व्यापामुळे चेहºयावर कोणताही उत्साह राहत नाही. परंतू, तुम्ही जर नियमीत योगाचा सराव केला तर दिवसभर ताजेतवाने व उत्साही राहू शकता. कामातून दहा मिनीटे वेळ काढून, ध्यान केले तर काम करण्यासाठी आणखी उत्साह येतो. * स्नायू बळकट होतात : दररोज न चुकता योगा केला तर स्नायूंना बळकटी येऊन, शरीराची ठेवन सुधारते. तसेच शरीर सशक्त, चपळ व लवचीक बनते. अंगदुखण्याचा त्रासही थांबतो. * अंतज्ञार्नात वाढ : योगा केल्यामुळे आपल्या अंतज्ञार्नात वाढ होते. याची अनुभूती आपल्या घ्यावयाची असेल तर आवश्य योगा करावा. यशस्वी जीवनाचा राजमार्ग : योगा !सध्याच्या स्पर्धेच्या जगात प्रत्येकाला धावपळ करावी लागत आहे. या धावपळीत वेळेअभावी फास्टफु ड, पिझ्झा, बर्गर, बेकरी पदार्थ आदींकडे वळतो. यामुळे खाण्याच्या सवयी बिघडून अपचन, मळमळ, गॅसेस, लठ्ठपणा अशा समस्या उद्भवू लागतात. त्यातच वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या प्रदुषणाचा शरीरावर होणारा परिणाम वेगळाच. या सर्व समस्यांचा विचार केला तर आज प्रत्येकजण एखाद्यातरी आजाराने ग्रस्त आहेच. त्यात ताणतणाव, नैराश्य, उदासिनता, नकारात्मकता, एकाकीपणा आदी आजार प्रामुख्याने जाणवतात. यासर्व समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी योगा सर्वात उपयुक्त असून हा मार्ग ज्यांनीही अंगिकारला त्याचे आयुष्य सफल झाले आहे. योगातील आसनांचा नियमित सराव केल्यास लठ्ठपणा, अपचन, गॅसेस, ब्लडप्रेशर, डायबेटिस यासारखे विकार दूर होतात. तसेच ध्यानधारणा, प्राणायामद्वारे अस्थिर, चंचल मन, नैराश्य, उदासिनता, डिप्रेशन आदी मनोविकारांपासून नेहमीच सुटका मिळेल. शिवाय शरीर सुदृढ आणि लवचिक होऊन व्यक्तिमत्त्वात सुधारणा होते. यामुळे आत्मविश्वास वाढून आपण आयुष्यात यशस्वी होतो. मनाची शांती ठेवण्यासाठी, योगा !सध्याचे ‘मॉडर्न कल्चर’ हे अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त मानले जाते. सर्व सुख-सुविधा तंत्रज्ञानाच्या जोरावर मनुष्याला उपलब्ध झाल्या आहेत. मात्र एवढे असूनही इतर प्राण्यांच्या तुलनेने बुद्धीमान असलेला मनुष्य हा खरच सुखी, समाधानी व आनंदी आहे का? आज प्रत्येकाकडे भरपूर पैसा आहे, सर्व टेक्नॉलॉजीयुक्त साधने आहेत. मात्र मनाची शांती नाही. मनुष्यांच्या गर्दीत असूनही एक टा असतो. त्यामुळे निराधार तसेच एकाकीपणा वाटतो. हळुहळु तणावग्रस्त होतो आणि नैराश्येच्या समस्येने ग्रासला जातो. विशेष म्हणजे या समस्येवर योग्यवेळी योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळत नसल्याने ही समस्या अधिकच बिकट होऊन लठ्ठपणा, ह्रदयविकार, मधुमेह, कॅन्सर आदी विकार जडले जातात. या समस्यांना दूर ठेवण्यांचा सर्वात प्रभावी पर्याय म्हणजे ‘योगा’ होय. योगामुळे वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन, उत्तम आरोग्य, यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योगा समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बºयाच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतू प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्र्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो. Also Read : International Yoga Day 2017 : ‘या’ अभिनेत्रींच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे योगा !