आज वजन वाढण्याची आणि लठ्ठपणाची समस्या जगभरात वेगाने पसरत आहे. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे वयस्कर लोकांनाच नाही तर तरूणांना सुद्धा वजन वाढण्याची समस्या होऊ लागली आहे. तुम्हालाही पायऱ्या चढताना धाप लागते किंवा खाली वाकताना त्रास होत असेल ही चिंतेची बाब आहे. कारण सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.
वजन वाढल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. कारण सुस्तपणा शरीराला आलेला असतो. आळसही जास्त येतो. शरीर बेढब दिसत असेल तर अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याचे काही सोपे योगाचे प्रकार सांगणार आहोत. त्यामुळे घरच्याघरी आपलं वाढलेलं वजन कमी करू शकता. हे सोपे योगाचे प्रकार तुम्ही कोणतंही साहित्य उपलब्ध नसतानाही करू शकता. त्यामुळे आजारांशी लढण्यासाठी तुमची रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा चांगली राहू शकते.
१) सूर्य नमस्कार
(Image Credit : readoo.in)
वजन कमी करण्यासाठी सूर्य नमस्कार फार प्रभावी असतो. यात १२ आसने असतात, ज्याचा संपूर्ण शरीरावर प्रभाव पडतो. सूर्य नमस्कार केल्याने मान, फुप्फुसं आणि मांसपेशी मजबूत होतात. तसेच ही आसने नियमित केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी देखील नष्ट होते. त्यामुळे वजन कमी होतं.
२) भुजंगासन
(Image Credit : Finess Yoga)
हे आसन करून शरीरात ऑक्सिजन अधिक जातं. अर्थातच त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. हे आसम दिवसभरातून १० वेळा केलं जाऊ शकतं. या आसनामुळे कंबर आणि पोटाच्या खालच्या भागात जमा झालेली चरबी सुद्धा दूर केली जाऊ शकते.
३) धनुरासन
या आसनामुळे वजन कमी होण्यासोबतच मांड्या, छाती आणि स्तनातील अतिरिक्त चरबी सुद्धा दूर होते. या आसनाने शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचं वजन कमी करता येतं. हे आसन केल्याने पोटावर ताण येतो आणि लवचिकपण निर्माण होतो.
४)त्रिकोणासन
(Image Credit : FashionLady)
वेगवेगळे प्रयत्न करूनही तुम्ही जर वजन कमी करू शकले नसाल तर आता त्रिकोणासन करून बघा. हे आसन नियमितपणे केल्याने तुम्ही सहजपणे कॅलरी बर्न करू शकता. याने वजन कमी करण्यास मदत मिळते. जर हे आसन वेगाने केलं तर फायदा लवकर होतो.
५) वीरभद्रासन
(Image Credit : Yoga Journal)
हे आसन केल्याने मांड्या, पोट आणि स्तनांवरील चरबी कमी होते. इतकेच नाही तर यान शरीराची आतंरिक शक्तीही वाढते. ज्यामुळे तुम्हाला अधिक काळासाठी शक्ती मिळते. या आसनामुळे तुमचे हात, खांदेही मजबूत होतात. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर हे आसन नियमितपणे करा.
(टिप : वरील योगाभ्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच करावा. कारण योगाभ्यास करताना काही नियम पाळणे गरजेचे आहे. ते पाळले गेले नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो.)
मोठा दिलासा! अखेर कधीपर्यंत तयार होणार कोरोनाची लस; WHOच्या तज्ज्ञांनी दिले उत्तर
लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसांचं होतंय नुकसान; संशोधनातून खुलासा