शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरे राजकीय उलथापालथीवर रोखठोक बोलले!
2
NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा
3
महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...
4
शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा
5
भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल
6
ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले
7
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
9
पुण्याच्या मैदानात Washington Sundar चा जलवा! न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला
10
बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट
11
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
12
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
13
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
14
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
15
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
16
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
18
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
19
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
20
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?

पोटावरील चरबी कमी करायचीये? जाणून घ्या खास आसन आणि ते करण्याची पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 9:20 AM

International Yoga Day 2024: एक खास योगासन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हलासन करता येईल.

International Yoga Day 2024: २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. योग शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. बरेच लोक पोटावरील चरबी वाढल्याने हैराण आहेत. जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर वेगवेगळी योगासने आहेत. त्यातील एक खास योगासन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हलासन करता येईल.

हलासनाचे फायदे

पोटावरील चरबी कमी करण्यासोबतच हलासन करण्याचे आणखीही काही फायदे आहेत. हलासन केल्याने मेटाबॉलिज्म चांगलं होतं. याने पोटासंबंधी समस्या दूर होतात. हलासन केल्याने मसल्ससोबतच मेंदूलाही आराम मिळतो.

हलासन हे हर्निया आणि मधुमेहाकरिता हे उपयुक्त आसन आहे. तसेच अपचनाचा विकार कमी होऊन भूक चांगली लागते. पोट, पित्ताशय आणि पाणथरी या रोगांवर गुणकारी आहे. पाठीचा कणा सशक्त आणि लवचिक होण्यास मदत होते. पुठ्ठे आणि पोट यांची अवास्तव वाढ कमी होण्यास हलासनाचा चांगला उपयोग होतो.

काय काळजी घ्याल?

सुरवातीला हलासन करणं अवघड होईल, त्यामुळे गडबड करू नका. सरावाने तुम्हाला हे सोपं होईल. हे करत असताना श्वासावर लक्ष द्या आणि पाय सरळ ठेवा. पाठ दुखू नये म्हणून जमिनीवर योगा मॅट ठेवा. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच हे योगासन करावं.

हलासन कसं कराल?

- जमिनीला पाठ टेकवून चटईवर झोपा. दोन्ही हात शरीराच्या बाजूला सरळ चिकटवून ठेवा. तळहात जमिनीवर दाबा.

- उत्तानपादासनासारखे दोन्ही पाय हळूहळू आणि सावकाश वर उचलून आकाशाच्या दिशेने सरळ करून थांबा.

- श्वास सोडून कंबर उचला. पाय डोक्याकडे मागे घ्या. दोन्ही पाय सावकाश जमिनीवर आणा.

- हात मुडपून दोन्ही हातांची मिठी डोक्याखाली ठेवा किंवा दोन्ही हात जमिनीवर सरळ पसरवा.

- पाय सरळ आणि जुळवून असू द्या. त्यांच्यामध्ये सांध ठेवू नका. या आसनाची ही अंतिम अवस्था आहे.

- या स्थितीत श्वासोच्छवास सामान्य ठेवा. या स्थितीत शक्य तितका वेळ आरामात थांबा. थांबण्याचा वेळ हळूहळू वाढवा.

- शेवटी हात सोडा. त्यांना दोन्ही बाजूस जमिनीवर ठेवा. सावकाश श्वास घ्या.

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स