कोरोना वायरस संक्रमण काळात अनेकांना कोरोना झाला. त्यातून काही यशस्वीरित्या बरेही झाले. तुम्हाला जर कोरोना होऊन गेला असेल आणि ज्यांना कोरोना नाही त्यांना तो न व्हावा असं वाटत असेल तर ही योगाशिवाय दुसरा उत्तम पर्याय नाही. आम्ही तुम्हाला अशी काही आसनांची माहिती सांगणार आहोत जी कोविडच्या या काळात तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.
बालासनहे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयोगाचे आसन आहे. हे आसन पाठीचे स्नायु मोकळे करतं आणि ताण हलका करतं. स्नायुंना आराम देत आणि उर्जा उत्पन्न करतं.
अनुवित्सासनफुफ्फुस बळकट करण्यासाठी हे महत्वाचे आसन आहे. यामुळे श्वासोच्छवासाची क्रिया सुलभ होते. त्यात काही अडथळा येत नाही. यामुळे शरीर डिटॉक्स व्हायलाही मदत होते.
प्राणायामदिर्घ श्वासोच्छवासामुळे चिंता आणि तणाव हलका होण्यास मदत करते. ज्या लोकांना डोकेदुखी, मायग्रेनची समस्या आहे त्यांच्यासाठी हे आसन म्हणजे वरदान आहे.
धनुरासनया आसनामुळे तुमच्या शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारतो. त्याचबरोबर तुमची चयापचय प्रक्रिया सुधारते. पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी हे उत्तम आसन आहे.
भुजंगासनया आसनाचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे होतो. त्याच्यामुळे लीव्हरवर येणारा ताणही कमी होतो. त्याचबरोबर पाचनक्रियाही सुधारते.