शरीरातील आयोडीनच्या कमतरतेमुळे वेगवेगळे आजार होतात. याबाबत तुम्हाला माहित असेल. अनेक जाहिरांतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर शरीरातील आयोडीनची कमतरता मीठाच्या सेवनाने भरून काढता येऊ शकते,असं दाखवलं जातं. सध्याच्या परिस्थितीत व्हायरसचं संक्रमण झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे व्हायरसचं संक्रमण होऊ नये. यासाठी आयोडीनचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला आहारात कोणत्या पदार्थाचा केल्याने आयोडीनची कमतरता पूर्ण होते याबाबत सांगणार आहोत.
भाजलेला बटाटा
भाजलेल्या बटाट्यात आयोडीनचे प्रमाण अधिक असते. भाजलेल्या बटाट्यांचा आहारात समावेश केल्याने अनेक पोषक तत्व मिळत असतात. त्यासाठी बटाट्याचं साल न काढता भाजून घ्या. त्यात आयोडीन, पॉटॅशियम आणि व्हिटामीन असतं. एक्सपर्ट्सच्यामते एका बटाट्यात जवळपास ४० टक्के आयोडीन असतं.
दूध
दुधाचे फायदे तुम्हाला माहितच आहेत. दुधात कॅल्शियम, प्रोटीन्सशिवाय आयोडीन सुद्धा असतं. एक कप दुधात ५६ मायक्रोग्राम आयोडीन असते. जे हाडांना बळकटी देण्यासाठी फायदेशीर ठरत असतं
मनुके
मनुके शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यासाठी रोज तीन ते चार मनुके खाणं गरजेचं आहे. त्यात ३४ मायक्रोग्राम आयोडीनचं प्रमाण असतं. जर तुम्हाला थायरॉईडसारखी गंभीर समस्या असेल तर मनुक्यांच्या सेवनाने ही समस्या कमी होऊ शकते.
दही
दही सगळ्यांचाच घरी असतं. उन्हाळ्यात आहारात दह्याचा समावेश करणं गरजेचं आहे. दही शरीराच्या दृष्टीने खूप फायदेशीर असतं. दह्यात असणार बॅक्टेरीअल गुण पचनक्रिया व्यवस्थिक ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे पोट साफ न होण्याची समस्या उद्भवत नाही.( हे पण वाचा-CoronaVirus : डायबिटीसच्या रुग्णाने 'असं' हरवलं कोरोनाला, जाणून बचावाचे उपाय)
ब्राउन राइस
ब्राऊन राईस आयोडीनच्या चांगल्या स्त्रोतांपैकी एक आहे. यात डाएटरी फायबर्स असतात. त्यामुळे कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून वजन कमी होण्यास मदत होते. म्हणून रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. ( हे पण वाचा-CoronaVirus : धक्कादायक! कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं कारण असू शकतं व्हेंटिलेटर, जाणून घ्या कसं)