शरीरातील व्हिटामीन, मिनरल्सप्रमाणेच आयोडीनसुद्धा एक महत्वाचा घटक असतो. आज आम्ही तुम्हाला आयोडिनचे शरीरातील कार्य काय असते. शरीरातील चयापचन नियंत्रित करण्यासाठी आयोडिनचा वापर कसा होतो. याबाबत सांगणार आहोत. आपल्या शरीरात आयोडीन तयार होत नसतं. योग्य आहार घेऊन आपल्याला शरीरातील आयोडिनची पातळी व्यवस्थित ठेवायची असते. शरीरातील आयोडीनची पातळी कमी झाल्यास समस्यांचा सामना करावा लागतो. जाणून घ्या समस्यांबाबत
सतत थकवा येणं
शरीरात आयोडिनची कमतरचा असल्यास सतत थकवा येतो. आयोडीनच्या कमतरतेमुळे शरीरातील थायरॉइड् ग्रंथी अंडरएक्टिव होतात. त्यामुळे थायरॉईड हार्मोन्स शरीरात योग्य प्रमाणात राहत नाहीत. परिणामी हाइपोथायरॉयडिज्मचं शिकार व्हावं लागतं.
हाइपोथायरॉयडिज्म
हाइपोथायरॉयडिज्ममुळे त्वचा कोरडी पडणं, केस गळणं, मासपेशींमध्ये वेदना ही शरीरातील आयोडीनच्या कमतरतेची लक्षणं आहेत. पुरूषांच्या तुलनेत महिलांना हा आजार उद्भवण्याची शक्यता जास्त असते. मासिक पाळीनंतर ही समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते.
वजन वाढणं
शरीरातील आयोडिनचं प्रमाण कमी झाल्यास अचानक वजन वाढण्याची समस्या उद्भवते. याचा हृदयावर नकारात्मक परिणाम होत असतो.
उपाय
अनेक जाहिरांतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, शरीरातील आयोडीनची कमतरता मीठाच्या सेवनाने भरून काढता येऊ शकते,असं दाखवलं जातं. सध्याच्या परिस्थितीत व्हायरसचं संक्रमण झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे व्हायरसचं संक्रमण होऊ नये. यासाठी आयोडीनचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे.
बटाटा
भाजलेल्या बटाट्यात आयोडीनचे प्रमाण अधिक असते. भाजलेल्या बटाट्यांचा आहारात समावेश केल्याने अनेक पोषक तत्व मिळत असतात. त्यासाठी बटाट्याचं साल न काढता भाजून घ्या. त्यात आयोडीन, पॉटॅशियम आणि व्हिटामीन असतं. एक्सपर्ट्सच्यामते एका बटाट्यात जवळपास ४० टक्के आयोडीन असतं.
मनुके
मनुके शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यासाठी रोज तीन ते चार मनुके खाणं गरजेचं आहे. त्यात ३४ मायक्रोग्राम आयोडीनचं प्रमाण असतं. जर तुम्हाला थायरॉईडसारखी गंभीर समस्या असेल तर मनुक्यांच्या सेवनाने ही समस्या कमी होऊ शकते.
दूध
दुधाचे फायदे तुम्हाला माहितच आहेत. दुधात कॅल्शियम, प्रोटीन्सशिवाय आयोडीन सुद्धा असतं. एक कप दुधात ५६ मायक्रोग्राम आयोडीन असते. जे हाडांना बळकटी देण्यासाठी फायदेशीर ठरत असतं.
CoronaVirus : उन्हाळा असो किंवा पावसाळा; 'ही' सवय असलेल्या लोकांना कोरोनाचा दुप्पट धोका!
मृतदेहावर कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो?; भारतीय डॉक्टर करणार संशोधन