शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
3
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
4
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
5
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
6
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
7
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
8
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
9
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
10
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
11
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
13
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
14
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
15
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
16
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

आयोडिनयुक्त मीठ की सैंधव मीठ, आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर कोणतं? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 3:21 PM

काही लोकांच्या मते, आयोडिनयुक्त मीठ खाणं चांगलं असतं, तर काही लोक सैंधव मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट (Rock salt) वापरणं अधिक आरोग्यदायी मानतात.

मीठ हा आपल्या स्वयंपाक घरातील महत्त्वाचा घटक आहे. मिठाशिवाय अन्नाला चव येणं शक्यच नाही. मीठ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि जवळजवळ प्रत्येकजण त्याचं सेवन करतो. खरं तर मीठाचे फायदे हे तुम्ही कोणतं मीठ वापरता यावर अवलंबून असतात. काही लोकांच्या मते, आयोडिनयुक्त मीठ खाणं चांगलं असतं, तर काही लोक सैंधव मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट (Rock salt) वापरणं अधिक आरोग्यदायी मानतात.

बाजारात मिळणाऱ्या मिठात आयोडिनचं प्रमाण जास्त असतं. हेल्दी लाइफस्टाईल एंजॉय करणारे लोक फक्त सैंधवाचं सेवन करण्यास प्राधान्य देतात. पण तुम्हाला आयोडिनयुक्त मीठ आणि सैंधव या मधील फरक माहीत आहे का? जर नसेल माहीत तर, या दोन प्रकराच्या मिठात काय फरक आहे आणि कोणतं मीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे जाणून घेऊयात. 

सैंधव आणि आयोडिन मिठात फरक काय?टेबल सॉल्ट म्हणजे स्वयंपाकघरात दररोज वापरलं जाणारं मीठ. त्याला समुद्री मीठ असंही म्हणतात. हे मीठ (Table salt) आयोडिनने समृद्ध असतं. दुसरीकडे, सैंधव मीठ हे गुलाबी दगडाला बारीक करून तयार केलं जातं. 1 चमचा आयोडिन मिठामध्ये 2360 मिलिग्रॅम सोडियम आढळते. तर 1 चमचा हिमालयीन गुलाबी मीठामध्ये सोडियमचं प्रमाण 1680 मिलिग्रॅम असतं. आयोडिन मिठाच्या तुलनेत सैंधवात एक तृतीयांश कमी सोडियम असतं. निरोगी जीवनशैलीचं पालन करण्यासाठी तुम्ही दररोज 140 मायक्रोग्रॅम आयोडिनचं सेवन करणं आवश्यक आहे.

आयोडिन मीठ खाण्याचे फायदेआयोडिन मीठ आयोडिन आणि सोडियम (Sodium) दोन्हीने समृद्ध आहे. ते खाल्ल्याने शरीरातील आयोडिनची कमतरता पूर्ण होते. आयोडिन हा थायरॉईड ग्रंथीच्या पोषणाचा मुख्य स्रोत मानला जातो. शरीरात आयोडिनच्या कमतरतेमुळे थायरॉईड ग्रंथी वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे शरीरात थायरॉईड हॉर्मोन्सही वाढू लागतात.

सैंधव मीठ खाण्याचे फायदेसैंधव मीठात आयोडिन मिठापेक्षा कमी प्रमाणात सोडियम आढळतं. खरं तर सोडियम हे जवळजवळ सर्व मिठांमध्ये आढळतं. शरीरात सोडियमचं प्रमाण वाढल्यास तुम्ही हृदयाशी संबंधित आजारांनाही बळी पडू शकता. या शिवाय सोडियम वजन वाढवण्याचं आणि रक्ताच्या नसांमध्ये पाणी वाढवण्याचं काम करतं. त्यामुळे जास्त प्रमाणात सैंधव खाणं आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतं.आयोडिन आणि सोडियमपैकी काय चांगलं?

आरोग्याबाबत जागरूक असलेल्या अनु आहुजाने जेवणात आयोडिन मिठाऐवजी सैंधव वापरणं सुरू केलंय. सैंधवात भरपूर मिनरल्स असतात, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते, असं तिला वाटतं. परंतु तज्ज्ञांच्या मते, टेबल सॉल्टमध्ये सोडियम आणि आयोडिन दोन्ही असतात. तर सैंधव मीठ हे सोडियमचा चांगला स्रोत मानलं जातं. निरोगी राहण्यासाठी आयोडिनचं सेवन करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच, आयोडिन मिठाऐवजी फक्त सैंधव सॉल्टचं सेवन करणं अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतं, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स