आयर्न म्हणजेच लोह शरीरासाठी किती गरजेचं आहे हे अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. अनेकदा डॉक्टरही आयर्नच्या टॅबलेट्स देतात. आयर्न हीमोग्लोबिनचा महत्वपूर्ण भाग आहे. हीमोग्लोबिनचा दोन तृतीयांश भाग आयर्न असतं. या आयर्नमुळेच आपल्या फुफ्फुसांमधून ताजं ऑक्सिजन संपूर्ण शरीराला पोहोचवलं जातं. म्हणजे जर शरीरात योग्य प्रमाणात आयर्न नसेल तर शरीर कमजोर होतं. त्यासोबतच आयर्नची कमतरता झाल्यास शरीराला वेगवेगळ्या समस्याही होऊ शकतात. खासकरुन लहान मुलांमध्ये आयर्न कमी असेल तर त्यांना पीडियाट्रिक ब्लड सेल डिसऑर्डरचा धोका होऊ शकतो.
काय आहे पीडियाट्रिक ब्लड सेल डिसऑर्डर?
पीडियाट्रिक ब्लड सेल डिसऑर्डर लहान मुलांमध्ये ब्लड संबंधी समस्या आहे. याने पांढऱ्या रक्त पेशी प्रभावित होतात. पांढऱ्या पेशी या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गरजेच्या असतात. शरीरातील बोन मॅरो म्हणजेच अस्थि मज्जा(हाडांच्या असलेले मुलायम तत्व) खूप जास्त प्रमाणात किंवा खूप कमी प्रमाणात पांढऱ्या पेशींचं निर्माण करतात तेव्हा हा आजार होतो. जेव्हा शरीरात पांढऱ्या रक्त पेशी कमी होतात, तेव्हा सामान्य संक्रमाणापासून आपला बचाव केला जाऊ शकत नाही. तेच जास्त पांढऱ्या रक्त पेशी जास्त असल्या तर ल्यूकीमिया आणि इतरही काही संक्रमण होण्याचा धोका असतो.
काय गरजेच्या आहेत प्लेटलेट्स?
आपल्या शरीरात असलेल्या प्लेटलेट एखादी जखम झाल्यावर त्यातून वाहणाऱ्या रक्ताला घट्ट करुन ते वाहण्यापासून रोखतात. मात्र रक्त पेशींमध्ये समस्या झाल्यावर प्लेटलेट आपलं कार्य योग्य करु शकत नाहीत आणि यामुळे जखम झाल्यावर रक्त अधिक वाहून जातं. रक्तासंबंधी कोणतीही समस्या लाल रक्त पेशी आणि पांढऱ्या रक्त पेशींना सामान्यपणे प्रभावित करतात. त्यासोबतच याचा प्लेटलेट्सवरही प्रभाव पडतो.
का होती ही समस्या?
रक्त पेशींसंबंधी विकार होण्यासाठी सर्वात जास्त आनुवांशिकता हे मुख्य कारण असतं. या समस्या जास्तकरुन आई-वडिलांकडून मुलांना होतात. जर गर्भवती असताना एखाद्या महिलेमध्ये आयर्नची कमतरता असेल तर त्यांच्यात लाल आणि पांढऱ्या रक्त पेशी कमी होतात. या कारणाने बाळाला पॉलीसिथीमिया वीरा (polycythemia vera) ही आनुवांशिक समस्या होऊ शकते. जर बाळाला एखादा ऑटोइम्यून आजार (उदाहरणार्थ - ल्यूपस) असेल तर याने ब्लड प्लेटलेट नष्ट होऊ लागतात. याने रक्त घट्ट होण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे जखम झाल्यावर रक्त अधिक प्रमाणात वाहून जातं. तसेच आणखीही काही समस्या आहेत ज्यामुळे पांढऱ्या रक्तपेशी वेगाने नष्ट होतात. अशात ज्या वेगाने पांढऱ्या रक्तपेशी नष्ट होतात, त्या वेगाने बोन मॅरो नवीन पेशी तयार करु शकत नाही. अशात समस्या अधिक वाढते.
ब्लड सेल डिसऑर्डरने आजार
जर तुमच्या रक्त पेशींमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या झाली तर याने एनीमिया, सिकल सेल एनीमिया यांसारख्या समस्या होतात. एनीमिया रक्त कमी झाल्यावर होणारी समस्या आहे. जेव्हा शरीरात रक्ताची कमतरता होते तेव्हा एनीमिया होतो. तर सिकल सेल एनीमिया एनीमियाचाच एक प्रकार असून हा जास्तकरुन आनुवांशिक कारणाने होतो. या आजाराने लाल रक्त पेशी प्रभावित होतात.