Garam Masala Health Benefits : भारतातील जवळपास सर्वच किचनमध्ये गरम मसाल्यांचा वापर केला जातो. गरम मसाल्याशिवाय काही भारतीय पदार्थ अजिबात चांगले लागत नाहीत. पण काही लोकांना याबाबत गैरसमजही असतात. त्यांना वाटतं की, गरम मसाले हे गरम असतात आणि यामुळे पोटात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होते. पण लाइफस्टाईल कोच ल्यूक कॉटिन्होनुसार, हा केवळ एक गैरसमज आहे. ते म्हणाले की, भारतीय मसाले गरम आहेतच, पण त्यांचे अनेक फायदे मिळतात. तसेच यांनी गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होत नाही.
कॉटिन्हो यांनी यासंबंधी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यात त्यानी दावा केला आहे की, गरम मसाल्यात वापरल्या जाणारे धणें, जिरं, जायफळ, दालचीनी, वेलची, लवंग, बडीशेप, दगडी फूल, कलमी या सगळ्यांचे आरोग्याला खूप फायदे मिळतात.
गॅस आणि अॅसिडिटी होते का?
ल्यूक कॉटिन्हो यानी सांगितलं की, आयुर्वेद आपल्या देशात चिकित्सा विज्ञानाला मिळालेलं एक वरदान आहे. काही लोक मानात की, गरम मसाले उष्ण असतात. याने पोटात उष्णता वाढते आणि यामुळे गॅस व अॅसिडिटीची समस्याही होते. हा फार मोठा गैरसमज आहे. गरम असले तरी त्यांची गरज असते. जर काही लोकांना गरम मसाल्यांमुळे समस्या होत असेल तर याची कारणे वेगवेगळी असू शकतात. पण सामान्यपणे हेल्दी व्यक्तीला गरम मसाल्यांनी नुकसान होत नाही.
गरम मसाल्यांचे फायदे
ल्यूक कॉटिन्हो सांगतात की, गरम मसाले डायजेशन अधिक चांगलं करतात. गरम मसाल्यांमधील अॅंटी-ऑक्सिडेंट पोटात गॅस्ट्रिक ज्यूस तयार करण्यात मदत करतात. लवंग आणि जिऱ्यामुळे अपचन दूर होतं. जे लोक म्हणतात की, ज्याना पोटात अॅसिडची समस्या असेल तर त्यांनी गरम पदार्थ खाऊ नये. पण तुम्हीही असं करत असाल तर तुम्ही मोठी चूक करत आहात. गरम मसाले डायजेस्टिव सिस्टीमसाठी चांगले असतात आणि डायजेस्टिव एंजाइम वाढवतात. इतकंच नाही तर यांनी ब्लॉटिंगची समस्याही दूर होते.
लिव्हर, किडनीतील टॉक्सिन काढतात
गरम मसाल्यांमध्ये फायटोन्यूट्रेंट्स आढळतात जे मेटाबलिज्म बूस्ट करतं. याने फॅट बर्न करण्यात मदत मिळते. म्हणजे गरम मसाला वजन कमी करण्यासही फायदेशीर आहे. त्यासोबतच गरम मसाल्यांमधील अॅंटी-ऑक्सिडेंट्स त्वचेची समस्याही दूर करतात आणि इंफ्लामेशन होऊ देत नाही. इतकंच नाही तर गरम मसाला किडनी आणि लिव्हरला डिटॉक्स करण्याचं कामही करतो. या दोन्ही अवयवातील विषारी पदार्थ बाहेर काढतात.
कुणी टाळावे
गरम मसाला खाल्ल्याने काही नुकसान नाहीये. पण कोणत्याही गोष्टी अति केली तर नुकसान होणारच. जर आधीच कुणाला काही समस्या असेल आणि डॉक्टरांनी मनाई केली असेल तर गरम मसाले खाऊ नका.