Moong Dal Water Benefits : वेगवेगळ्या डाळींचं सेवन करण्याचा सल्ला नेहमीच डॉक्टर देत असतात. कारण या डाळी शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. डाळींमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्व असतात. ज्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. पण तुम्हाला आठवत असेल की, आजारी पडल्यावर मूग डाळ खाण्याचाच सल्ला जास्त दिला जातो. कारण मूग डाळीमध्ये मॅग्नीज, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉलेट, कॉपर, झिंक आणि व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. जे खूप फायदेशीर असतात. अनेकदा मूग डाळीचं पाणी पिण्याचाही सल्ला दिला जातो. याचं कारण आज आपण जाणून घेऊया.
मूग डाळीच्या पाण्यातील पोषक तत्व
एक्सपर्ट सांगतात की, सामान्यपणे एक वाटी मूग डाळीच्या पाण्यात प्रोटीन १४ ग्रॅम, फॅट १ ग्रॅम, फायबर १५ ग्रॅम, फॉलेट ३२१ मायक्रोग्रॅम, शुगर ४ ग्रॅम, कॅल्शिअम ५५ मिली, मॅग्नेशिअम ९७ मिली, झिंक ७ मिली असतं. त्यासोबतच या डाळीच्या पाण्यात व्हिटॅमिन बी१, बी५, बी६, थियामिन, डायटरी फायबर आणि रेजिस्टेंट स्टार्चही भरपूर असतं.
कसं बनवाल मूग डाळीचं पाणी?
मूग डाळीचं पाणी तयार करण्यासाठी कुकरमध्ये दोन कप पाणी गरम करा. या गरम पाण्यात मूग डाळ टाका आणि चवीनुसार मीठ टाकून साधारण २ ते ३ शिट्या होईपर्यंत शिजवा. त्यानंतर डाळ चांगली बारीक करा. यातील पाणी वेगळं काढा. तुमचं डाळीचं पाणी पिण्यासाठी तयार आहे.
मूग डाळीच्या पाण्याचे फायदे
लठ्ठपणा कमी होतो
बदलती लाइफस्टाईल आणि धावपळीच्या जीवनामुळे आजकाल लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. लोकांना लठ्ठपणाची समस्या जास्त होत आहे. तुम्हालाही लठ्ठपणा कमी करायचा असेल तर मूग डाळीच्या पाण्याचं सेवन सुरू करा. याने मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. ज्यामुळे वजन वेगाने कमी करण्यास मदत मिळते.
विषारी पदार्थ बाहेर काढा
मूग डाळीचं पाणी नियमित सेवन केल्याने शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत मिळते. सोबतच या डाळीचं पाणी प्यायल्याने लिव्हर, गॉल ब्लॅडर, रक्त आणि आतड्यांची स्वच्छताही होते.
डायबिटीसमध्ये फायदेशीर
मूग डाळीचं पाणी पिण्याचा सल्ला डायबिटीस असलेल्या रूग्णांना दिला जातो. कारण मूग डाळीचं पाणी शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यासोबतच मूग डाळ ब्लड ग्लूकोजला नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. ज्याने डायबिटीस नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते.
डेंग्यूपासून बचाव
पावसाळा आला की, डासांची समस्या वाढते. या दिवसात डेंग्यू होण्याचा धोकाही जास्त असतो. अशात मूगाच्या डाळीचं पाणी सेवन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. या डाळीचं पाणी सेवन करून इम्यून सिस्टम बूस्ट होतं, ज्याने डेंग्यूसारख्या गंभीर आजारापासून बचाव होतो.
लहान मुलांना आवर्जून द्या
मूग डाळीच्या पाण्यात अनेकप्रकारचे पोषक तत्व असतात, जे लहान मुलांसाठी फार फायदेशीर असतात. सर्वात खास बाब ही आहे की, या डाळीचं पाणी सहजपणे पचतं. या डाळीने लहान मुलांची इम्यून पॉवर वाढते आणि त्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. ज्यामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून त्यांचा बचाव होतो.