Benefits of Sleeping Naked: झोपण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अनेक एक्सपर्ट सांगतात की, कपडे न घालता झोपल्याने शरीराला खूपसारे फायदे मिळतात. पण हे सगळ्यांना शक्य होतं असं नाही. खासकरून भारतीय घरांमध्ये असं करणं जरा अवघडच आहे. तरीही माहिती म्हणून आज आम्ही तुम्हाला अंगावर एकही कपडा न घालता झोपल्याने काय काय फायदे होतात हे सांगणार आहोत.
स्वतःच्या शरीराकडे सकारात्मकतेने पहाल
स्वतःला नग्न पाहणे आणि शरीराच्या आकाराला स्विकारणे ही अनेकांसाठी कठीण बाब आहे. काही मॉडेल्स आणि सिनेतारकांची ‘परफेक्ट बॉडी’ आंधळेपणाने आदर्श मानून अनेकांना स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो. कपडे न घालता झोपल्याने स्वतःबद्दलचे असे काही गैरसमज दूर करून स्वतःला स्विकारणे अधिक सुकर होते.
वजन कमी करण्यास मदत
एक्सपर्ट्स सांगतात की, कपडे न घालता झोपल्याने आपलं मेटाबॉलिज्म मजबूत होतं, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. सोबतच डायबिटीसचा धोकाही कमी होतं, असं मानलं जातं. खासकरून उन्हाळ्यात असं झोपल्याने शरीराला आराम मिळतो आणि झोपही चांगली लागते.
प्रजनन क्षमता वाढते
युनिव्हर्सिटी ऑफ सॅन्डफॉर्ड आणि नॅशनल हेल्थ इन्स्टिट्युट ऑफ़ चाईल्ड अॅन्ड ह्युमन डेव्हलप्मेंट 2015 यांच्या अभ्यासानुसार, जे लोक टाइट अंडरविअर घालून झोपतात त्यांच्यात स्पर्म काउंट कमी आढळतो. तुम्ही जर टाइट अंडरविअर घालून झोपत असाल तर अंडकोषांना आराम मिळत नाही आणि याचा परिणाम प्रजनन क्षमते पडतो.
स्ट्रेस कमी होतो
कपडे न घालता झोपण्याचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे असं झोपल्याने स्ट्रेस कमी होतो. आजकाल वेगवेगळ्या कारणांमुळे लोक स्ट्रेसमध्ये जास्त राहतात. अशात झोपण्याच्या या पद्धतीचा तुम्हाला फायदा मिळू शकतो. सोबतच उन्हाळ्यात असं झोपल्याने शरीराचं तापमान चांगलं होतं. सोबतच ऑक्सीटोसिन हार्मोन रिलीज झाल्याने शरीरा रिलॅक्स होतं.
हृदय निरोगी राहतं
कपडे न घालता झोपल्याने शरीर रिलॅक्स होतं आणि तुम्हाला चांगली झोप लागते. तुम्ही जर चांगली झोप घेतली तर अर्थातच हृदय निरोगी राहतं. तसेच असं झोपल्याने डायबिटीस, हृदयरोग आणि हायपरटेंशन अशा समस्यांचा धोकाही कमी राहतो.