कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) गेल्या २ वर्षांपासून प्रत्येकाच्याच जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. अनेकांचं वर्क फ्रॉम होम (Work From Home) सुरू आहे. त्यामुळे बाहेर वॉकला जाण्याची, व्यायाम करण्याची सवय निघून गेली आहे. त्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. बदलत्या जीवनशैलीचा शरीरावर आणि मनावर परिणाम होतोय. आजारांचं प्रमाण वाढलंय. शिवाय सर्वांत मोठी एक समस्या बहुतांशी लोकांना भेडसावत आहे ती म्हणजे वाढतं वजन.
झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, एकदा वाढलेलं वजन कमी करणं, हे खूप मोठं जिकिरीचं काम आहे. जिमला (Gym) जाऊनही बऱ्याच जणांचं वजन कमी होत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय केले तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. घरातील काही पदार्थांचं सेवन करून तुम्ही वजन कमी करू शकता. त्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात इसबगोलचा समावेश करा. इसबगोल शरीरासाठी खूप फायदेशीर असून तुम्ही त्याचं दररोज सेवन करू शकता.
इसबगोलमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमीइसबगोलमध्ये (Isabgol) कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात. तसंच ते खाल्ल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे लवकर भूक लागत नाही. जर तुम्ही दररोज सकाळी नाश्त्यात इसबगोल खाल्लं तर वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते आणि पोटावरची अतिरिक्त चरबीही कमी होते. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय.
पोटाच्या समस्या होतील दूरइसबगोलमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने अॅसिडीटी (Acidity) आणि बद्धकोष्ठतेच्या (Constipation) समस्यांपासून सुटका होते. तसंच पोटाचे इतर विकारही दूर होतात. इसबगोलचं सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
इसबगोलचं सेवन कसं करावं?तुम्ही इसबगोल पाण्यात किंवा ज्यूसमध्ये मिसळून पिऊ शकता. काही लोक इसबगोलचं सरबत तयार करून पितात. २ चमचे इसबगोल ग्लासभर पाण्यात मिसळून त्याचं रोज सेवन करणं शरीरासाठी उत्तम आहे. बरेच जण सकाळी रिकाम्यापोटी ते इसबगोलचं सेवन करतात. परंतु, तुम्ही दिवसातून दोन वेळा त्याचं सेवन केलं तरी हरकत नाही.
इसबगोल तसंच हेल्दी आहार घेऊन तुम्ही वजन कमी करू शकता. बाहेरचं खाणं टाळून रोज व्यायाम केल्यासही तुम्हाला वाढलेलं वजन कमी करण्यास मदत होईल. याशिवाय आहारामध्ये केवळ दुपारचं किंवा संध्याकाळचं जेवण महत्त्वाचं नसून सकाळचा नाश्ता (Breakfast) महत्त्वाचा असतो. सकाळी योग्य प्रमाणात नाश्ता केल्यानंतर संध्याकाळचं जेवण कमी कॅलरीचं (Calorie) घेतल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.