Isabgol For High Cholesterol: जर वेळीच बॅड कोलेस्ट्रॉल कमी केलं नाही तर याने जीवाला धोकाही होऊ शकतो. सामान्यपणे खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे नसांमध्ये एलडीएल जमा होऊ लागतं. ज्यामुळे पुढे जाऊन डायबिटीस, लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅकसारखे आजार होऊ शकतात. पण जर वेळीच कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर डेली डाएटमध्ये इसबगोल (Isabgol)चा समावेश करा.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी इसबगोल
इसबगोलचा हेल्दी डाएट लिस्टमध्ये समावेश केला जातो. ज्याद्वारे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, हे सुपरफूड आपल्या आतड्यांमध्ये एक पातळ थर तयार करतं. ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल एब्जॉर्ब होत नाही आणि सकाळी टॉयलेटच्या माध्यमातून बाहेर पडतं.
कसं कराल याचं सेवन
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रोज इसबगोलचं सेवन करू शकता. यासाठी एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि यात एक चमचा इसबगोल टाका. अनेक एक्सपर्ट सायंकाळी याचं सेवन करण्याचा सल्ला देतात. काही आठवड्यांमध्येच तुमच्या शरीरात फरक दिसेल.
या गोष्टींची घ्या काळजी
काही लोकांना इसबगोलच्या सेवनानंतर पोटदुखी, बद्धकोष्ठता, पोटात गॅस, डायरियासारख्या समस्या होतात. अशात याचं सेवन लगेच बंद केलं पाहिजे. सोबतच वेळीच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.
इसबगोलचे फायदे
इसबगोलचं नियमि सेवन केलं तर रक्तवाहिन्यांमधून बॅड कोलेस्ट्रॉल दूर होतंच सोबतच शरीरालाही इतर अनेक फायदे मिळतात. चला जाणून घेऊ फायदे...
- डायजेशन होईल चांगलं
- बद्धकोष्ठता होणार नाही
- डायबिटीसमध्ये फायदेशीर
- बॉडी डिटॉक्स होईल