भारतात खाण्याचे खूप शौकीन लोक आहेत. लहान गाव असो वा मोठं शहर तिथे लोक पाणीपुरी फार आवडीने खातात. चौकाचौकात पाणीपुरी विकणारे लोक दिसतात. त्यांचे गर्दीही तेवढीच असते. पण आजकाल पाणीपुरीच्या पाण्याची टेस्ट वाढवण्यासाठी यात भेसळही केली जात आहे. त्यात मिठाचं अॅसिड अधिक वापरलं जात आहे. जे आरोग्यासाठी फार नुकसानकारक आहे. अशात आज आम्ही सांगणार आहोत की, पाण्यात काही भेसळ केली असेल तर ते कसं ओळखाल.
मिठाचं अॅसिड
आजकाल खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये भेसळीचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. याद्वारे एकप्रकारे लोकांना स्लो पॉयझन दिलं जात आहे. कारण यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. जास्तीत जास्त लोक पाणीपुरी खातात. पण दुकानदार आपल्यासाठी त्यात भेसळ करतात. पाणीपुरीचं पाणी आणखी टेस्टी बनवण्यासाठी दुकानदार त्यात मिठाचं अॅसिड टाकतात. हे अॅसिड त्यांना दुकानात सहजपणे मिळतं.
कसं ओळखाल?
पाणीपुरीच्या पाण्यात काही भेसळ असेल तर तुम्ही ते ओळखू शकता. ज्या भांड्यात पाणीपुरीचं पाणी ठेवलं आहे ते बारकाईने बघा. जर भांड्याचा रंग हलका झाला असेल तर पाण्यात भेसळ केल्याने असं होऊ शकतं. तसेच जर स्टीलच्या प्लेट्समध्ये पाणीपुरी खात असाल आणि प्लेट्स चमकदार नसेल तर पाण्यात अॅसिड असू शकतं. त्याशिवाय पाणीपुरी खाताना तुम्हाला वाटत असेल की, दातांवर एक थर जमा होत आहे तर पाण्यात भेसळ असू शकते. आणखी एक बाब म्हणजे पाणीपुरीच्या पाण्यात भेसळ असेल तर टेस्ट थोडी कडवट लागते आणि पोटात जळजळ होते. असं काही आढळलं तर तुम्ही पोलिसात तक्रार करू शकता.