लोक वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करतात. काही लोक कमी खातात, काही एक्सरसाइज करतात तर काही लोक लिक्विड डाएटचा आधार घेतात. जर तुम्हीही वजन कमी करण्यासाठी असाच काही उपाय करत असाल तर हे तुम्ही हे वाचायला हवं. आज आम्ही तुम्हाला अशा एका घटनेबाबत सांगणार आहोत, ज्यात एक महिला वजन कमी करण्यासाठी लिक्विड डाएट करत होती. पण यामुळे तिचा मेंदू नेहमीसाठी डॅमेज झाला आहे.
ही घटना आहे इस्त्राइलची. theepochtimes.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, येथील एका ४० वर्षीय महिलेला टेल अवीवच्या एका मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. इथे डॉक्टरांनी सांगितले की, महिलेने गेल्या तीन आठवड्यात केवळ स्ट्रीक्ट ज्यूस डाएट केली आहे. ज्यामुळे महिलेच्या मेंदूचं नुकसान झालं आहे.
रिपोर्टनुसार, महिलेने डाएट सुरु करण्याआधी अल्टरनेट थेरपीची सुरुवात केली होती. या थेरपीदरम्यान महिलेला केवळ ज्यूस आणि पाणी पिण्यासाठी सांगण्यात आलं होतं. शरीरात मिठाचं असंतुलन झाल्यामुळे त्यांचं वजन ४० किलो पेक्षाही कमी झालं होतं.
वेगवेगळ्या टेस्ट केल्यावर डॉक्टरांनी सांगितले की, महिला हायपोनाट्रेमिया नावाच्या समस्येचा सामना करत आहे. या समस्येला मेडिकल सायन्समध्ये वॉटर इंटॉक्सिनेशन नावाने ओळखले जाते. ही समस्या तेव्हा होते जेव्हा ब्लड वेसल्समध्ये सोडियमचं प्रमाण कमी होतं.
डॉक्टरांनी सांगितलं की, आता जास्त ज्यूस डाएट घेतल्या कारणाने महिलेचा मेंदू नेहमीसाठी डॅमेज झाला आहे. सध्या या महिलेवर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांना भीती आहे की, जास्त काळापर्यंत कुपोषण आणि जास्त तरल पदार्थांचं सेवन केल्याने महिलेच्या मेंदूला आणखी नुकसान होऊ शकतं. पण हे केवळ तेव्हाच जाणून घेता येईल जेव्हा महिलेची स्थिती स्थिर होईल.
इस्त्राइलमधील मीडियाने महिलेने ही डाएट का सुरु केली होती याचं कारण दिलं नाहीये. पण सामान्यपणे ही डाएट डीटॉक्स किंवा वजन कमी करण्यासाठी केली जाते.