- नेहा नाशिककर
आपल्याही नकळत माध्यमं आपली विचारप्रक्रिया घडवतात. आपल्या वर्तनावर प्रभाव टाकतात. आणि आपण नकळत त्यासार्यात वाहून जातो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणार्या स्टार महिलांच्या आई होण्याच्या आणि त्यातून लगेच वजन घटवून कामाला लागण्याच्या बातम्या. अशा बातम्या देताना काही भान ठेवावं का, याविषयी बोलण्यात काही हाशील नाही. पण त्या बातम्या वाचून स्वतर्वर आणि बाळावर अन्याय करणार्या अनेकींनी मात्र काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. कारण बाळंतपणानंतर लगेच वजन घटवून अतीश्रम करण्याची घाई आरोग्याला बरी नाही.होतं काय करीना कपूरने बाळंतपणानंतर इतके किलो वजन घटवले, सोहा खान ने तितके, राणी मुखर्जी बॅक इन शेप, शिल्पा शेट्टीने तर काय फिगर कमावली अशा बातम्या वर्तमानपत्र, अनेक वेबसाईटस, टीव्हीवाले हमखास दाखवतात. आणि घरबसल्या त्या बातम्या वाचून अनेकजणी स्वतर्वर प्रयोग करू लागतात. बाळंतपणानंतर वाढलेलं वजन कमी व्हावं आणि आपणही (इतरांनी ठरवलेल्या) सौंदर्यमापात जाऊन बसावं असं वाटू लागतं.मात्र त्यानं आपल्या बाळावर काय परिणाम होईल, आपल्या शरीरावर काय परिणाम होइल याचा मात्र विचार केला जात नाही. आणि डाएट सुरू होतं. जीम लावलं जातं. खाणं कमी केलं जातं. मूल अंगावर पीत असताना हे सगळे उद्योग म्हणजे त्या मुलाचंही पोषण न करणं आणि आपलंही.केवळ दिसणं हे सौंदर्य नसतं तर बाळांतपणानं झालेली शरीराची झीजही भरुन यायला हवी. आपल्या बाळंतपणाच्या पारंपरिक आहारात हा विचार केलेला आहे.मात्र वजन वाडेल या भितीनं अनेकजणी पौष्टिक अन्न खात नाहीत. दूध पित नाही. आराम करत नाहीत.अतीच व्यायामाला लागतात. परिणाम म्हणून पचन बिघडतं. हाडं कुरकुरकुरायला लागतात. हे टाळा, किमान करीना कपूर बाळंतपणात गुळ भाकरी, तीळाची, जवसाची चटणी खात होती हे जरी लक्षात ठेवलं तरी पुरे!दुध भाकरी, खिचडी, तूप, जवसाची चटणी, सूर्यनमस्कार घालणारी करीना विसरुन चालणार नाही. आणि आधुनिकतेच्या नावाखाली पारंपरिक आहारविचार बाजूला ठेवून बाळंतपणानंतर पिझा खाणंही फार बुद्धीमत्तेचं लक्षण नाही, हे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपलं शरीर आपले आभार मानू शकेल!