भारतीय संस्कृतीनुसार जेवताना खाली, जमिनीवर मांडी घालून जेवलं जातं. आधी एखाद्या समारंभामध्ये जेवणासाठी पंगती मांडल्या जायच्या. पुढे बदललेल्या पद्धतीनुसार आणि पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे डायनिंग टेबलवर बसून जेवण्याची पद्धत भारतातही रूढ झाली. पण तुम्हाला माहीत आहे का? जमिनीवर बसून जेवणं आणि जमिनीवर जेवणं यामध्ये फार फरक आहे. आयुर्वेदानुसार, जमिनीवर मांडी घालून जेवल्यामुळे अनेक आजार दूर होतात. पण आपण जर जमिनीवरच जेवू लागलो तर मात्र आपलं शरीर अनेक आजारांना बळी पडतं.
जमिनीवर पडलेलं अन्न खाणं
अनेकदा लहान मुलं खेळता खळेता जमिनीवर पडलेला पदार्थ सहज तोंडात टाकतं. पालकांचं लक्ष गेलं की, ते मुलांना थांबवतात. परंतु पालकांचं दुर्लक्ष झाल्यानंतर मुलं पुन्हा जमिनीवर पडलेलं अन्न म्हणजेच, चॉकलेट, आइस्क्रीम, चिप्स यांसारखे पदार्थ पटकन तोंडात टाकतात. यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, जमिनीवर पडलेलं अन्न किती वेळात बॅक्टेरियायुक्त होतं?
'5 सेकांदांची टेस्ट'
जमिन कितीही स्वच्छ असली तरिही त्यावर बॅक्टेरिया असतातच. अशातच जेव्हा अन्न जमिनीवर पडतं त्यावेळी त्यावर अनेक बॅक्टेरिया पाच सेकंदांनी चिकटतात. ही पाच सेकंदांची थिअरी असून जर एखादा पदार्थ जमिनीवर पडल्यानंतर जर तो पाच सेकंदांच्या आतमध्ये उचलला तर त्यावर कोणत्याही बॅक्टेरियांचा परिणाम होत नाही. परंतु ही थिअरी अनेक लोकांना मान्यही आहे आणि याबाबत कॉन्ट्रोवर्सिही आहे.
किती बॅक्टेरिया स्थानांतरित होतात?
2007मध्ये क्लेम्सन यूनिवर्सिटीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनात, जमिनीवर पडलेल्या अन्नामध्ये स्थलांतरित होणाऱ्या बॅक्टेरियाचे प्रमाण जमिनीवरील एकूण बॅक्टेरियावर अवलंबून असते. त्याचा पदार्थाशी आणि पदार्थ जमिनीवर किती वेळ आहे याच्याशी काहीही संबंध नसतो.
पृष्ठभागावर अवलंबून असतं
संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, एखाद्या पदार्थावर तो कोणत्या पृष्ठभागावर पडतो यावर परिणाम ठरतात. उदाहरणार्थ, जर एखादा पदार्थ लाकडावर किंवा टाइल्सऐवजी कारपेटवर पडला तर त्यावर कमी बॅक्टेरिया इफेक्ट करतात. बॅक्टेरियांचे संगोपन करण्यासाठी टाइल्स किंवा लाकडासारखे चिकट पृष्ठभाग परिणामकारक ठरतात.
पदार्थांवरही अवलंबून असतात परिणाम
काही अभ्यासंकांच्या मते, पदार्थांवर बॅक्टेरिया किती प्रमाणात परिणाम करतात हे पदार्थ कोणता आहे यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, जॅम, जेली किंवा आईस्क्रिमसारखा चिकट पदार्थांवर सॅन्डविच, बिस्किट आणि फळांसारख्या शुष्क खाद्य पदार्थांच्या तुलनेत वेगाने बॅक्टेरिया चिकटतात.
जमिनीवर पडलेलं अन्न खावं का?
हा प्रश्न अनुत्तरितच आहे, कारण जमिनीवर पडलेले अन्न पदार्थ खावे की नाही? हे त्या व्यक्तीच्या विचारांवर ठरतं. तसेच पदार्थ ज्या पृष्ठभागावर पडतो, त्या भागातील स्वच्छतेवरही अवलंबून असते. हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायकही ठरू शकते. त्यामुळे असं करणं शक्यतो टाळणचं फायदेशीर ठरतं.