शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
2
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
3
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
4
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
5
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
6
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
8
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
9
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
10
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलं! (VIDEO)
11
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
12
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
13
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
14
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
15
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
16
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
17
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
18
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
19
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
20
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा

आला पावसाळा...आता आरोग्य सांभाळा, वेळीच घ्या काळजी नाहीतर होतील गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 4:19 PM

पावसाळा आता मध्यावर आला आहे. सतत कोसळणारा पाऊस काहीसा कमी झाला आहे. पावसाळा-उन्हाळा-हिवाळा अशा मिश्र वातावरणाचा प्रभाव आपल्याला अनुभवता येत आहे. त्यामुळे आज आपण अशा ऋतूत नक्की कशी काळजी घ्यायची हे पाहू....

पावसाळा आता मध्यावर आला आहे. सतत कोसळणारा पाऊस काहीसा कमी झाला आहे. पावसाळा-उन्हाळा-हिवाळा अशा मिश्र वातावरणाचा प्रभाव आपल्याला अनुभवता येत आहे. त्यामुळे आज आपण अशा ऋतूत नक्की कशी काळजी घ्यायची हे पाहू. बदलत्या वातावरणाचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे काही प्रमाणावर काळजी घेणे आवश्यक आहे.हात - पाय स्वच्छ धुणेआपल्याला लहान असल्यापासून शिकवलेले आहे बाहेरुन आल्यावर हात पाय धुणे. आपण प्रवासात, बस, ट्रेन मध्ये चढता- उतरताना, ऑफिसमध्ये, मार्केटात, शाळेत, कॉलेजात, आपले हात आपल्या नकळत ब्याक्टेरिया, वायरसेस जमा करत असतात. त्यामुळे बाहेरून घरी पोचल्यावर, प्रत्येक जेवणाआधी, काहीही खाण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. आजकाल आपल्याला hand sanitizer सहज उपलब्ध असतात. ते जवळ बाळगा आणि त्याचा योग्य वापर करा.

पावसाळ्यात रस्त्यावरचे किंवा उघड्यावर ठेवलेले अन्न खाणे टाळावेआरोग्याची काळजी खूप महत्वाची आहे. पावसाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते.  बॅक्टेरिया, वायरसेसचे वाढलेले प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. अनेकदा हे पदार्थ बनवण्यासाठी वापरलेले पाणी नीट गाळलेले उकळलेले नसते त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. उघड्यावर ठेवलेल्या खाण्यावर माश्या बसून ते अन्न दुषित करतात. त्यामुळे बाहेरचे अन्न खाने टाळावे.

डासांपासून सुरक्षित रहा पावसाळ्याच्या दिवसात डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे डासांपासून सुरक्षेची काळजी घ्या. डासांना दूर ठेवणारे क्रीमचा वापर करा तसेच घरात किंवा घराच्या आसपास पाणी फार काळ साठून राहणार नाही ह्याची काळजी घ्या. साठलेल्या पाण्यात डासांची पैदास जास्त होते. डासांमुळे डेंगू मलेरिया सारखे आजार पसरतात.

पाणी उकळून प्या आणि त्याचे प्रमाण वाढवा पावसाळ्यात कमी तहान लागते त्यामुळे आपोआप कमी पाणी प्यायले जाते. पण स्वास्थ्य राखण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती साठी, शरीरातील टॉक्सिन्सचा नीट निचरा होण्यासाठी शरीराला साधारण ३ लिटर पाण्याची गरज असते. त्यामुळे आठवण ठेऊन, गरज पडल्यास दर एक तासाचा अलार्म लावून दिवसभरात ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

योग्य आहार घ्यावापावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते तेव्हा सकस, शुद्ध, पोषक घरचे अन्नच खावे. भाज्या, फळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला, पचन चांगले व्हायला मदत होते. त्यामुळे ह्या गोष्टींचा आपल्या रोजच्या आहारात भरपूर समावेश करावा. मसाल्याचे पदार्थ सुद्धा पचनाला मदत करतात. पण पावसाळ्यात खूप तिखट पदार्थ खाणे टाळावे.

रोग प्रतिकार शक्ती वाढवा लसूण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे सर्दी खोकला, ताप अशा पावसाळी आजारांपासून सहज संरक्षण मिळते. मसाल्याचे इतर पदार्थ देखील रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त ठरतात. तसेच मसाल्याचे पदार्थ जसे की मिरपूड, आले, हिंग, हळद, कोथिंबीर, जीर लिंबू पचनसंस्था नीट काम करण्यासाठी देखील मदत करतात. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स