जगभरात कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी तज्ज्ञांचा अभ्यास सुरू आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत लवकरच जगभरातील मोठ्या लोकसंख्येला फायदा होईल. असा अंदाज लावण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही संक्रमितांची आणि मृतांची वाढती संख्या चिंतेचं कारण ठरली आहे. दरम्यान संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार एका औषधाच्या वापरानं फक्त कोरोना व्हायरस निष्क्रीय होणार नाही तर याचा प्रभाव कमी करण्यासही मदत होईल.
एफएलसीसीसीचे अध्यक्ष व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पियरे कोरे असे नमूद करतात की, ''आम्ही आयव्हरमॅक्टिन औषधासाठी उपलब्ध आकडेवारीचा सखोल अभ्यास केला आहे. अनेक स्तरांवर घेतलेल्या आढावा आणि डेटा अभ्यासाच्या आधारे, आम्ही असे म्हणू शकतो की आयव्हरमॅक्टीन औषधाचा वापर कोरोना विषाणूच्या या गंभीर साथीचा विनाश करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.''
आयव्हरमॅक्टिन 1975 मध्ये शोधले गेले आणि 1981 मध्ये सार्वजनिक वापरासाठी लाँच करण्यात आले. हे औषध जगातील पहिले एंडोकॅटोसाइड म्हणजे अँटी परजीवी औषध म्हणून व्यापकपणे ओळखले जाते. तज्ञांचा असा विश्वास आहे की हे औषध शरीराच्या आत आणि बाहेरील परजीवी विरूद्ध अत्यंत प्रभावी ठरू शकते. त्यानंतर, 1988 मध्ये, हे औषध ऑन्कोकेरिएसिस (रिवर ब्लाइंडनेस) नावाच्या रोगासाठी वापरले गेले. अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार
एचआयव्ही, डेंग्यू, झिका आणि इन्फ्लूएन्झा सारख्या विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी तज्ज्ञांना हे औषध प्रभावी ठरत असल्याचे आढळले आहे. अलिकडच्या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार तज्ज्ञांना कोरोनाशी लढण्यासाठी हे औषध प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा
कमी होऊ शकतो कोरोनामुळे उद्भवत असलेल्या मृत्यूचा धोका
अभ्यासातून तज्ज्ञांना दिसून आलं की, या औषधाच्या वापरानं कोरोनातून रिकव्हर होण्यास तसंच शरीरातील व्हायरसचा प्रभाव कमी करण्यास मदत होऊ शकते. संक्रमणासह मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी या औषधाचा वापर फायदेशीर ठरेल. जवळपास २५०० रूग्णांवर करण्यात आलेल्या संशोधनातून दिसून आलं की, या औषधाचे नियमित सेवन आजारांचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.