गूळ हा एक नॅच्युरल स्वीटनर आहे. जो तुम्ही तुमच्या आहारात अनेक प्रकारे वापरू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साखरेचा पर्याय म्हणून गुळाचा सहज वापर करू शकता. गुळाच्या साहाय्याने अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. उसाच्या रसापासून तयार केला जाणारा हा गूळ वर्षभर बाजारात सहज उपलब्ध असतो. गूळ अनरिफाइन्ड असतो. ज्यामुळे त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. म्हणून गूळ साखरेपेक्षा जास्त आरोग्यदायी (Health Benefits Of Jaggery) मानला जातो. आज आम्ही तुम्हाला या गुळाचे काही महत्वाचे फायदे सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते.
सांधेदुखी कमी करतो गूळसध्याच्या धावत्या काळात कोणीच शांत राहू शकत नाही. माणसाला सतत काम करत राहावे लागते. मात्र यामुळे तब्येतीची हेळसांड होते. अशात सांधेदुखीची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? गुळाच्या सेवनाने तुमच्या सांधेदुखीच्या तक्रारी कमी होऊ शकतात. आपण दररोज गुळाचे सेवन केले तर आपल्याला चांगले परिणाम मिळतील.
गुळामुळे सुधारते पचनक्रियागुळामध्ये भरपूर फायबर आढळते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. याच्या सेवनाने पचनशक्ती मजबूत होते. जेवणानंतर गूळ खाल्ल्याने अन्न लवकर पचते. असे शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध झाले आहे. म्हणूनच गुळाचे सेवन नियमित करावे. याशिवाय रात्री झोपताना गूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि सकाळी बद्धकोष्ठता किंवा अपचन सारखी समस्या होत नाही.
अॅनिमियासाठी उपयुक्तआपल्या शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमियाची समस्या उद्भवते. मात्र ही समस्या जास्त प्रमाणात स्त्रियांमध्ये दिसते. कारण मासिक पाळीच्या दरम्यान महिलांच्या शरीरातून रक्त बाहेर येण्यामुळे लाल रक्तपेशी कमी होतात. अशा परिस्थितीत गूळ खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. गुळामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. अशक्तपणाचा त्रास असलेल्या व्यक्तीने हरभरा गुळामध्ये मिसळून खावा. यामुळे लोहाचे प्रमाण वाढेल.
वजन कमी करण्यासाठी प्रभावीजर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर गुळाच्या पाण्याचे सेवन करणे हे सर्वात प्रभावी औषध आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक आहारतज्ञ गुळाच्या पाण्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात. सकाळी रिकाम्या पोटी गुळाचे पाणी नियमितपणे प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होते.