न्यूयॉर्क : अमेरिकन सायकॉलॉजिस्ट असोसिएशननुसार, तणाव आजच्या पिढीची सर्वात मोठी समस्या आहे. खासकरुन महिला याने जास्त ग्रस्त आहेत आणि याचं मुख्य कारण त्यांचं प्रोफेशन आहे. इतकेच नाही तर त्यांचं प्रोफेशन त्यांना ३० वयाच्या आधीच बर्नआउटच्या कचाट्यात ढकलू शकतं. अभ्यासकांनुसार, पत्रकारितेमघ्ये बर्नआउटचा धोका अधिक असतो.
काय आहे बर्नआउट?
इंटरनॅशनल क्लासिफिकेशन डिजीजनुसार, बर्नआउट एक खूप जास्त थकव्याची स्थिती आहे. यात भावनात्मक थकवा, मानसिक थकवा, तणाव आणि वैयक्तीत बढती न मिळत असल्याने मानसिक निराशा निर्माण होणे यांचा समावेश आहे. यासोबतच बर्नआउटला गंभीर तणाव आणि निराशासोबतही जोडलं जाऊ शकतं. गेल्या काही वर्षांमध्ये या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे की, बर्नआउट एक मानसिक आजार मानला जावा, पण वर्तमानात याकडे मानसिक विकार म्हणून पाहिलं जात नाही.
पत्रकारांना बर्नआउटचा धोका का?
मायो क्लिनीक आणि सायकॉलॉजी टुडेसारख्या प्रतिष्ठित मेडिकल सेंटरवर बर्नआउटसारख्या स्थितीची योग्य वेळ माहीत करण्याची आणि यापासून वाचण्यासाठी काही उपाय देण्यात आले आहे. पण काही प्रोफेशन असे असतात ज्यांच्यावर बर्नआउटचा धोका अधिक असतो. त्यातीलच एक पत्रकारिता आहे. चला जाणून घेऊ पत्रकारिता कशाप्रकारे व्यक्तीला या स्थितीत घेऊन जाते.
पत्रकारांना सतावतीये भविष्याची चिंता
यूनिव्हर्सिटी ऑफ कान्सासने पत्रकारितेत बर्नआउटची स्थिती आणि जॉब सॅटिस्फॅक्शनबाबत दोन अभ्यास केले. पहिला अभ्यास २००९ मध्ये केला गेला आणि त्याचा फॉलोअप अभ्यास २०१५ मध्ये करण्यात आला.
अभ्यासकांना न्यूजरुममध्ये पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असमानता तर आढळल्याच सोबतच पहिल्या अभ्यासात त्यांना आढळून आले की, ६२ टक्के महिला आपल्या करिअरच्या भविष्याबाबत संदिग्ध आहेत. म्हणजे त्यांना आपल्या करिअरबाबत शंका आहे. इतकेच नाही तर या महिलांनी पत्रकारिता सोडण्याचही ठरवलं होतं. २०१५ मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात ही संख्या ६७ टक्के वाढली.
याचा अर्थ असा आहे की, फार कमी महिला या करिअरला पुढे सुरु ठेवतील. अभ्यासकांनी या स्थितीची काही कारणे सांगितली त्यात चांगलं पद न मिळणे, दुसऱ्या शिफ्टमध्ये जास्त काम असणे आणि कंपनीकडून पूर्णपणे समर्थन न मिळणे यांचा समावेश आहे. या सर्व लक्षणांमधून हे संकेत मिळतात की, भविष्यात पत्रकारांमध्ये बर्नआउट होण्याची शक्यता अधिक आहे.