तुम्हीही जंक फूड खाण्याचे शौकीन आहात का? असं असेल तर वेळीच सावध व्हा. कारण तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, ज्या महिला अधिकाधिक जंक फूडचं सेवन करतात, त्यांना वाढणाऱ्या वजनाच्या समस्येचा सामना करावा लागत असून यांमुळे वंधत्व आणि इन्फर्टिलिटी यांसारख्या समस्याही होतात. जंक फूड इतरही अनेक शरीराच्या गंभीर समस्यांचं कारण ठरतं. यांमध्ये हृदय रोग, हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल, शरीरामध्ये जास्त फॅट्स जमा होणं, फॅटी लिव्हर यांसारख्या अनेक समस्यांचा सामना जंक फूडमध्ये करण्यात येतो. याशिवाय जंक फूडमध्ये मीठाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हाय ब्लड प्रेशरचाही सामना करावा लागू शकतो.
जंक फूड महिलांसाठी का ठरतं नुकसानदायी?
जर तुम्ही दररोज जंक फूडचं सेवन करत असाल तर शारीरिकरित्या तुम्ही कमकुवत होऊ शकता. कारण यांमध्ये पोषक तत्वांची कमतरता होते. फॅट्सही मुबलक प्रमाणात असून ते शरीरासाठी हानिकारक ठरतात. तसेच जंक फूडचं अधिक सेवन ब्लड सर्क्युलेशन मदं गतीने होण्यासाठी कारणीभूत ठरतं. परिणामी याचा प्रभाव हृदयावर होतो. त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू लागतं. याव्यतिरिक्त वजन वाढल्यामुळे वंध्यत्वाची समस्याही होते. वंध्यत्वाचं मुख्य कारण पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम असतं. यामुळे तयार होणारे सिस्टवर वेळीच उपचार केले नाहीत तर त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो.
पीसीओएस झाल्यामुळे काय होऊ शकतं?
तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, जवळपास 10 टक्के महिला तरूणपणीच पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम (पीसीओएस) या समस्येने ग्रस्त होतात. साधारणतः ही समस्या महिलांच्या प्रजननच्या वयापासून मोनोपॉजपर्यंत प्रभावित करतात. महिला आणि पुरूष दोघांच्याही शरीरामध्ये प्रजननासंबंधातील हार्मोन्स तयार होतात. एंड्रोजेंस हार्मोन पुरूषांसाठी शरीरामध्येही तयार होतात. परंतु, पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोमच्या समस्येने ग्रस्त असणाऱ्या महिलांच्या अंडाशयामध्ये हार्मोन्स सामान्यपेक्षा अधिक तयार होतात. याच कारणामुळे सिस्ट किंवा गाठीमध्ये रूपांतरित होतात. अनेकदा ही लक्षणं कॅन्सरचीदेखील असू शकतात. ही स्थिती अत्यंत घातक ठरते.
वजन वाढविण्यासाठी कारणीभूत
जास्त फॅट्स असलेले पदार्थांचं सेवन करणं, व्यायामाची कमतरता आणि जंक फूड यांमुळे वेगाने वजन वाढतं. जास्त फॅट्समुळे एस्ट्रोजन हार्मोन्स वाढतात. जे ओव्हरीमध्ये सिस्ट तयार होण्यासाठी कारणीभूत ठरतात. अशातच वजन कमी करून हा आजार कमी केला जाऊ शकतो. जीवनशैली सुधारण्यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये सुधारणा करणं गरजेचं असतं. जंक फूडऐवजी हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचं सेवन करा. असं केल्यानेच तुम्ही स्वतःचं या रोगांपासून बचाव करू शकता.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळए कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.