- मयूर पठाडेपावसाळ्यातला तो सारखा पाऊस, चिकचिक, दमट वातावण.. अशा डल वातावरणात आपल्यालाही डल वाटायला लागतं, पण याच काळात आजारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. लहान मुलांनी तर दवाखाने अक्षरश: भरलेले असतात. हाच काळ असा आहे, ज्यावेळी डास, मच्छर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जीवजंतूंचीही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असते. कारण हाच काळ त्यांच्या वाढीसाठी खूपच पोषक असतो.मुलांची रोगप्रतिकारशक्ती पूर्णत: विकसित झालेली नसल्याने याच काळात हे जीवजंतू त्यांच्यावर आक्रमण करतात आणि लहान मुलं आजारांनी त्रस्त होतात.याच काळात मुलांची मोठ्या प्रमाणात काळजी घेणं गरजेचं असतं. अर्थात त्यासाठी फार काही करण्याची गरज नाही, पण काही महत्त्वाच्या आणि ठराविक गोष्टी केल्या तरी आपली मुलं या आजारांपासून दूर राहू शकतील आणि त्यांच्या आनंदी बागडण्यानं घरंही प्रफुल्लित राहू शकेल.काय काळजी घ्याल?1- पावसाळी वातावरणात मच्छरांपासून आपल्या मुलांना जपा. डासांपासून अनेक आजार पसरतात.२- या काळात अनेक आजारांनी थैमान मांडलेलं असतं. अॅलर्जिक आजार तर या काळात वाढतातच, पण कावीळ, व्हायरल फिवर, डेंग्यू, मलेरियासारखे आजारही मुलांना लगेच आपल्या कह्यात घेतात.३- मच्छरांपासून मुलांचं रक्षण करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर अवश्य केला जावा. मच्छर कोणत्याही प्रतिबंधक उपायांना दाद देण्यास फार लवकर शिकतात. त्यामुळे त्यांना अटकाव करणं फारच कठीण असतं. त्यामुळे मच्छरदाणी हा त्यातल्या त्यात सर्वोत्तम उपाय.४- या काळात पाणी दुषित झालेलं असतं. त्यामुळे डायरिया, टॉयफॉइडसारखे आजारही लगेच बळावतात. त्यासाठी मुलांना उकळून गार केलेले पाणी देणे केव्हाही उत्तम.५- शक्यतो पावसाळी वातावरणात मुलांना फार वेळ बाहेर आणि गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये. मुलांना इन्फेक्शन होण्यास वेळ लागत नाही.६- आपल्या आसपासचा परिसर तर स्वच्छ असावाच, पण मुलांची वैयक्तिक स्वच्छताही या काळात खूपच महत्त्वाची.या गोष्टींची काळजी घेतली तर आपलं मूल नक्कीच वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवील आणि त्यामुळे आपलं घरही हसतं, आनंदी राहील.
या पावसाळ्यात आपलं मूल सारखं आजारी पडतंय?..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 4:16 PM
थोडीशी काळजी घेतली तर मुलांपासून दूर पळवता येतील आजार..
ठळक मुद्देमच्छर आणि इतर जीवजंतूंपासून मुलांची काळजी घ्या, मच्छरदाणीचा आवर्जुन वापर करा. मुलांना उकळून गार केलेले पाणी देणे केव्हाही उत्तम.पावसाळी वातावरणात मुलांना फार वेळ बाहेर आणि गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये. मुलांची वैयक्तिक स्वच्छताही या काळात खूपच महत्त्वाची.