हायपोथायरॉयडिज्म म्हणजेच ती स्थिती असते जेव्हा थायरॉइड ग्रंथीमुळे थायरॉइड हार्मोन्सची निर्मिती कमी होते. अशात स्थितीत वजन वाढणं सामान्य बाब आहे. थायरॉइड हार्मोन्स जास्त प्रमाणात असल्यानेही वजन अधिक वाढतं. भारतात राहणाऱ्या ४२ लोकांना थायरॉइडची समस्या आहे आणि त्यांना वजन कमी करण्यासही वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो.
पीडित व्यक्ती कॅलरी बर्न करू शकत नाही
थायरॉइडने ग्रस्त व्यक्ती थायरॉइड हार्मोन्सचा स्तर कमी झाल्यानेही कॅलरी बर्न करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचं वजन वाढतं. थायरॉइडने पीडित व्यक्ती जर योग्यवेळी आणि योग्य आहार सेवन करेल तर त्यांना वजन कमी करण्यास मदत मिळते. पण हे करत असताना काही गोष्टींची फार काळजी घ्यावी लागते.
वजन कमी करण्यासाठी काय करावं
यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की, तुम्ही एक संतुलित आणि पौष्टीक आहार सेवन करा. थायरॉइडचं प्रमाण कमी होवो किंवा जास्त होवो, हेल्दी डाएटबाबत कोणताही निष्काळजीपणा करू नका. सेलेनियम आणि आयोडिनची कमतरता असल्यामुळे शरीरात थायरॉइडची कार्यप्रणाली वाईट पद्धतीने प्रभावित होते. त्यामुळेच योग्य आहार घेणे महत्त्वाचे ठरते.
सेलेनियम आणि आयोडिनचा आहार
डाएटमध्ये अशा पदार्थांचा समावेश करा ज्यात सेलेनियम आणि आयोडिनसारखे महत्त्वाचे तत्व भरपूर प्रमाणात असतील. जसे की, अंडी, फिश, सूर्यफुलाच्या बिया, सीफूड इत्यादी. आयोडिन थायरॉइड हार्मोन्सच्या निर्मितासाठी मदत करतं. तर सेलेनियम शरीरात आयोडिनच्या रिसायक्लिंगसाठी मदत करतं.
कॉम्प्लेक्स कॉर्ब्स खावे
कॉम्प्लेक्स कॉर्ब्सचा आहारात समावेश करावा कारण यात फायबर भरपूर प्रमाणात असतं. तसेच या पदार्थांच्या सेवनामुळे फार जास्त वेळ भूक शांत राहते. कडधान्य, भाज्या आणि डाळी खाल्ल्याने तुमचं पोट भरलेलं राहील आणि त्यामुळे तुम्ही ओव्हरइटिंग करणार नाहीत.
एक्सरसाइज
अशी एक्सरसाइज करा ज्याने तुमचं मेटाबॉलिज्म वाढेल. थायरॉइडची कमतरता असल्याकारणाने मेटाबॉलिज्म कमी होतं आणि अशा स्थितीत तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर मेटाबॉलिज्म बूस्ट करणे आणखीनच गरजेचं असतं. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिवेंशन म्हणजेच सीडीसीनुसार, सामान्य वजनाच्या व्यक्तीने कमीत कमी १५० मिनिटांची मॉडरेट फिजिकल अॅक्टिविटी किंवा आठवड्यातून एकदा ७५ मिनिटांची हेव्ही एक्सरसाइज करावी. याने तुम्ही वजन कंट्रोलमध्ये ठेवू शकता.
व्हाइट ब्रेड, मैदा आणि केक टाळा
ग्लायसिमिक इंडेक्स अधिक प्रमाणात असलेल्या पदार्थांपासून दोन हात दूरच रहा. जसे की, कॉर्न, व्हाइट ब्रेड, मैदा, केक इत्यादींपासून. या पदार्थांमुळे शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण अधिक वाढतं जे नंतर फॅटमध्ये रुपांतरित होतं.
ही काळजी घ्या
भलेही तुम्ही वजन करण्याचा प्रयत्न करत असाल पण अशा स्थितीत आयोडिन घेणं फार गरजेचं आहे. पण याचं सेवन संतुलित पद्धतीने व्हावं. भरपूर झोप घ्या व स्ट्रेसपासून दूर रहा. प्रोसेस्ड फूड खाऊ नका आणि भरपूर पाणी प्या.