शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

जास्त काळ तरुण राहायचंय? वार्धक्याच्या खुणा पुसायच्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 3:31 PM

हा उपाय करून पाहा.. तुमची आजारपणंही पळतील दूर..

ठळक मुद्देपचनशक्तीत सुधारणा होईल वाढत्या वयाच्या खुणा चेहºयावर दिसणार नाहीतमेंदू तल्लख होईल

- मयूर पठाडेतुम्ही कुणीही म्हणाल, अक्रोड ही काय आमच्या आवाक्यातली गोष्ट आहे का? साधे शेंगदाणे आणायचे तर आम्हाला चार वेळा विचार करावा लागतो आणि तुम्ही अक्रोडची गोष्ट करताय.तुम्ही म्हणताय, ते बरोबरच आहे. सर्वसामान्य माणसाला रोज अक्रोड खाणं शक्य नाही. अक्रोडसारख्या ड्राय फु्रटसचा आपण फक्त स्वप्नातच विचार करायचा..पण हे अक्रोड काही आपल्याला रोजच्या रोज आणि मुठीच्या मुठी भरून खायचे नाहीत.अक्रोडचा आपल्या शरीराला काय फायदा होतो यासंदर्भात नुकतंच एक संशोधन झालं आणि त्यातून खूप आश्चर्यकारक गोष्टी लक्षात आल्या.अक्रोड आपल्या प्रकृतीसाठी तर उत्तम आहेच, पण अनेक आजारांवरही रामबाण उपाय म्हणून ते काम करतात. 

अक्रोडमध्ये असं आहे तरी काय?१- अक्रोडमधली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपली पचनशक्ती सुधरवतात. हो, पण जास्त खाल्ले तर बिघडवतातही२- आपल्या शरीरात दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात. चांगले आणि वाईट. अक्रोडमुळे शरीरात चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते आणि त्यामुळे आरोग्याला मदत होते.३- या अभ्यासाचा अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे दृदयविकार, कॅन्सर आणि डिमेन्शिया या अत्यंत घातक अशा आजारांपासून ते आपल्याला दूर ठेवतात. या आजारांची शक्यता अक्रोडमुळे खूपच लांब पळते.४- एवढंच नाही, याशिवाय आपलं तारुण्य टिकवणं, वार्धक्याला आपल्यापासून चार हात दूरच ठेवणं, संधिवाताला आटोक्यात ठेवणं, मेंदू तल्लख ठेवणं.. यासारखे अनेक फायदे अक्रोडमुळे होतात.५- अक्रोडमुळे आपल्या आतड्यांवर सकारात्मक परिणाम होतो. त्यांच्यात बदल होतो आणि विविध आजारांना रोखण्यासाठी त्याची मदत होते.६- शास्त्रज्ञांनी अगोदर उंदरांवर हा प्रयोग केला आणि त्यांच्या लक्षात आलं, अक्रोडमुळे उंदीर चांगलेच हेल्दी झाले आहेत.७- माणसांसाठीही अक्रोड तितकेच फायदेशी आहेत असं अमेरिकेतील या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे...आणि आता, आपला पहिला प्रश्न.. अक्रोड आम्हाला परवडणार कसे?.. तेवढी आमची ऐपतच नाही. पण त्याचंही उत्तर शास्त्रज्ञांनी देऊन ठेवलंय. रोज रोज आणि खूप अक्रोड खाण्याची गरज नाही. दोन महिने जरी तुम्ही नियमितपणे अक्रोड खाल्ले तरी तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल.किती खाल?एक अक्रोड चालेल?..मग तेवढाच खा.त्यानंतर हाच प्रयोग पुन्हा काही महिन्यांनी करा. तुमची ऐपत असेल तर आपल्याला झेपतील एवढे अक्रोड रोज खाल्ले तरी चालतील..करून तर पाहा..डॉक्टरांवर आपण इतके पैसे खर्च करतो, थोडे पैसे यासाठीही खर्च करून पाहू..काय?..