(Image Credit : isorepublic.com)
आज मोबाईल आपल्या मुलभूत गरजांपैकी एक झाला आहे. अशात तुमच्याकडे फोन असणे गरजेचेही आहे आणि नाइलाजही आहे. त्यामुळेच आपण नेहमी आपण मोबाईल आपल्या जवळ ठेवतो. अनेकजण ऑफिस आणि घरातील टॉयलेटमध्येही मोबाईल सोबत घेऊन जातात. अशात जर तुम्ही मोबाईल तुमच्या शरीराच्या काही अंगांजवळ ठेवता तेव्हा त्याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतो.
मागच्या खिशात फोन ठेवणे घातक
जर तुम्हाला वाटत असेल की, पॅंटच्या मागच्या खिशात फोन ठेवणे सुरक्षित आहे तर तुम्ही चुकीचा विचार करताय. याने तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पॅंटच्या मागच्या खिशात फोन ठेवल्यावर त्यावर दाब पडू नये म्हणून आपण शरीराच्या एकाच भागावर जास्त जोर देऊन बसतो. याचा शरीरावर खूप प्रभाव पडतो. त्यामुळे नेहमी हे लक्षात ठेवा की, फोन स्वत:पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी फोनचा वापर केल्यास तुमची झोप उडू शकते आणि याने तुम्हाला अनिद्रेची समस्या होऊ शकते.
रेडिएशनने होतं आरोग्याचं नुकसान
हे सर्वांनाच माहीत आहे की, जास्तीत जास्त लोक हे पॅंटच्या खिशात फोन ठेवतात. याने फोन कधी कुठे पडत नाही आणि चोरीला सुद्धा जाण्याचा धोका कमी असतो. पण याने आपल्या शरीराला फार जास्त नुकसान होतात.
एक्सपर्टनुसार, जर तुम्ही खिशात मोबाईल ठेवत असाल तर तुमच्या शरीरावर रेडिएशनमुळे होणारा धोका वाढतो. हे धोका तुमच्या बॅगमध्ये मोबाईल ठेवण्याच्या नुकसानापेक्षा दुप्पटच नाही तर त्यापेक्षाही जास्त घातक असतं. याने आपल्या डीएनएच्या स्ट्रक्चरवर सुद्धा प्रभाव पडतो आणि आपल्या हृदयालाही नुकसान होतं. एक्सपर्टनुसार, पॅंटच्या खिशात मोबाइल ठेवल्याने रेडिएशन आपल्या पोल्विक बोन्सना कमजोर करतात.