अनेकांना वाटतं की, उपवास करणे सोपे आहे. त्यांना वाटत असतं की, नेहमीचा आहार न घेता केवळ फळे खायचे आणि झाला उपवास...पण जर उपवास करत असताना शरीराला योग्य प्रमाणात कॅलरी मिळाल्या नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. तुम्हाला आरोग्यदायक वेगवेगळ्या समस्याही होऊ शकतात. अशात तुम्ही आता नवरात्रीमध्ये उपवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. यामुळे तुम्हाला उपवास करताना काळजी घेण्यास मदत मिळेल.
1) डायबिटीजच्या पेशन्ट्ससाठी वेळेवर जेवण करणे, औषध घेणे गरजेचं असतं. अशात त्यांनी जर उपवास करून शरीराची उपासमार केली तर त्यांना त्याचा मोठा फटका बसू शकतो.
2) हाय ब्लड प्रेशरच्या बीपीच्या पेशन्टनी जर उपवास केला तर त्यांचं बॉडी सिस्टम बिघडू शकतं. उपवास केल्याने त्यांना अधिक त्रास होण्याची शक्यता अधिक असते.
3) नुकतीच ज्या पेशन्टची सर्जरी झाली आहे त्यांनीही उपवास करू नये. सर्जरी झाल्यानंतर जखम सुकण्यासाठी बॉडीला आवश्यक व्हिटॅमिन आणि मिनरल्सची गरज असते.
4) ज्या लोकांमध्ये रक्ताची कमतरता आहे त्यांनी उपवास करू नये. उपवास केल्यास अशांना शरीरात कमजोरी आणि थकवा अधिक जाणवू शकतो.
5) हार्टच्या पेशन्टना खाण्या-पिण्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं. जर ते जास्त वेळ उपाशी राहिले तर त्यांच्या शरीराचं सिस्टम बिघडू शकतं.
6) ज्या लोकांना फुफ्फुसामध्ये काही त्रास असेल तर त्यांनीही उपवास करू नये. याने त्रास अधिक वाढू शकतो.
7) प्रेग्नेंट महिलांना सतत व्हिटामिन्स आणि मिनरल्सची गरज असते. जर या दरम्यान त्यांनी उपवास केला तर अशाने महिला आणि तिच्या बाळावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
8) स्तनपान करणाऱ्या महिलांनीही उपवास करू नये. यामुळे मुलांना आवश्यक ते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळत नाहीत. याचा मुलांच्या वाढीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.
काय घ्याल काळजी?
तळलेले पदार्थ खाऊ नका
राजगीऱ्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे उपवास केला असल्यास याचा डाएटमध्ये समावेश करणे फायद्याचे ठरेल. त्यासोबतच साबुदाणा सुद्धा उपवास करताना खाऊ शकता. पण फार तळलेले पदार्थ टाळावेत. दिवसातून केवळ एकदाच काही खाणे टाळा. याने अॅसिडिटी आणि उलटी होऊ शकते.
पौष्टीक आहार घ्या
डाएटमध्ये अचानक मोठा बदल झाल्याने शरीरावर प्रभाव पडतो. त्यामुळे जे काही खाल त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. कमी तेलाचे पदार्थ खावे. तसेच दिवसभर हलकं काहीतरी खात रहावं.
ज्यूसने शरीर ठेवा हायड्रेट
उपवास दरम्यान शरीराची काळजी घेणे फार गरजेचे आहे. तुम्हाला हवं असेल तर हेल्दी ज्यूसचं सेवन करा. व्हिटॅमिन ए, बी आणि सी असलेली फळे आणि भाज्यांचा ज्यूस तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक तसेच हेल्दी वाटेल.
चहा-कॉफी टाळा
उपवास केला असताना चहा किंवा कॉफी घेणे टाळा कारण या दोन्हीमध्ये कॅफीन असतं. याने शरीर स्ट्रेस्ड होतं. तसेच याने झोपण्याची रोजची पद्धतही प्रभावित होते.