केरळमध्ये सन स्ट्रोकमुळे 3 लोकांचा मृत्यू; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:44 PM2019-03-25T13:44:25+5:302019-03-25T13:45:13+5:30
सध्या वातावरणामध्ये बदल घडून येत असून उकाडा वाढत आहे. अजून मार्च महिना संपलाही नाही आणि केरळमध्ये सन स्ट्रोकमुळे तीन लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आहे.
(Image Credit : Asian Institute of Medical Sciences)
सध्या वातावरणामध्ये बदल घडून येत असून उकाडा वाढत आहे. अजून मार्च महिना संपलाही नाही आणि केरळमध्ये सन स्ट्रोकमुळे तीन लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी याबाबत माहिती दिली असून राज्य सरकारचा कर्मचारी करुणाकरण (42) रविवारी आपल्या शेतामध्ये काम करत असाताना अचानक बेशुद्ध पडला. त्याला त्वरित जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.
करुणाकरनचं शव सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये पोस्टमार्टमसाठी नेण्यात आलं. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी सन स्ट्रोक असण्याची शक्यता वर्तवली. कारण मृत व्यक्तीच्या खांद्यावर भाजल्याचे निशाण आढळून आले होते. त्यानंतर कन्नूरमध्ये एका आणि पथानमथित्ता जिल्ह्यामध्ये एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली.
भारतीय हवामान विभाग (आयएमडी) ने पुढिल दोन दिवसांबाबत सांगितल्यानुसार, राज्यातील 14 जिल्ह्यांमधील 11 जिल्ह्यांमध्ये तापमान 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. आरोग्य विभागानुसार, मार्च महिन्याला सुरुवात झाल्यापासून संपूर्ण राज्यामध्ये 100 लोक सनस्ट्रोकने पीडित आहेत.
उष्णतेचं हे भीषण रूप देशभरातील विविध राज्यांमध्येही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हीही सन स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे.
काय आहे सन स्ट्रोक?
वातावरातील वाढलेल्या उष्णतेमुळे सनस्ट्रोकचा सामना करावा लागतो. अनेकदा लोक अति उष्णतेमुळे सन स्ट्रोकच्या जाळ्यामध्ये येतात. अनेकदा याकडे दुर्लक्षं करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. उन्हाळ्यामध्ये कडक उन्हासोबत वारेही वाहतात. यामुळे सन स्ट्रोक होण्याची शक्यता वाढते. वातावरणामध्ये होणाऱ्या या बदलांमुळे शरीरामध्येही उष्णता वाढते.
का होतो सन स्ट्रोक?
डोक्यामध्ये हायपोथॅलेमस नावाचा एक भाग असतो. जो शरीराच्या तापमानाला 95 ते 98.6 फेरनहाइटमध्ये नियंत्रित करतं. जेव्हा उष्णतेमुळे हायपोथॅलेमस असामान्य प्रकारे काम करू लागतं, त्यावेळी शरीराचं तापमान वाढू लागतं. ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये सन स्ट्रोक असं म्हणतात. जेव्हा तापमान वाढतं, त्यावेळी शरीराला थंड ठेवणं गरजेचं असतं. शरीरामध्ये वाढलेली उष्णता घामामुळे बाहेर निघण्यास मदत होते. परंतु जेव्हा सन स्ट्रोक होतो, त्यावेळी ही उष्णता शरीरामध्येच राहते. त्यामुळे हायग्रेड फीवर होतो.
सन स्ट्रोक झाल्याची लक्षणं
सन स्ट्रोकमुळे डोकेदुखी, अशक्तपणा, अंगदुखी, सतत तोंड कोरडं पडणं, उलट्या होणं. चक्कर येणं. ताप येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागणं, हात-पाय किंवा डोळे जळजळणं, शरीरामध्ये पाण्याची कमतरता होणं, तसेच ब्लड प्रेशर लो होणं. यांसारखी लक्षणं दिसून येतात.
लक्षणांकडे दुर्लक्षं करणं ठिक नाही
सन स्ट्रोकनंतर शरीरामध्ये उष्णता वाढते. त्याचबरोबर थकवाही येतो. अंग दुखू लागतं आणि शरीराचं तापमान वाढू लागतं. अनेकदा ताप तर 105 किंवा 106 डिग्री सेल्सिअसवर पोहोचतो. अशा अवस्थेमध्ये ब्लडप्रेशर लो होतं आणि लिव्हर-किडनीमध्ये सोडियम पोटॅशिअमचं संतुलन बिघडतं. अशातच व्यक्तीची शुद्ध हरपते आणि ब्रेन किंवा हार्ट स्ट्रोकची स्थितीही उद्भवते. जर वेळीच उपचार केले नाही तर व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.
उपचार
डिहायड्रेशन झालं असेल तर त्या व्यक्तीला लिंबू पाणी, ओआरएस किंवा ग्लुकोज इत्यादी थोड्या-थोड्या वेळाने पिणं आवश्यक असतं. सतत होणाऱ्या उलट्या आणि जुलाबांमुळे शरीरामध्ये होणारी पाणी आणि मिठाची कमतरता भरून काढण्यासाठी हे पदार्थ मदत करतात. यामध्ये शरीराला आवश्यक असणारे केमिकल सोडियम आणि पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करतात. सतत पाणी आणि थंड पदार्थ म्हणजेच, लिंबू पाणी, नारळाचे पाणी, बेलफळाचा सरबत. कैरीचं पन्हं यांसारख्या पदार्थांच्या सेवनाने शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते.