Kidney Damage Side effect : किडनी शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याची जबाबदारी किडन्यांवर असते. शरीराच्या या फिल्टरमध्ये काही समस्या झाली तर शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेदना होऊ लागतात. पाठ, पोट आणि पासोळ्यांमध्ये किडनी खराब झाल्यावर वेदना होऊ लागतात. जर तुम्हालाही अशा काही समस्या असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे.
शरीरात दोन किडनी असतात. ज्या फिल्टरचं काम करतात. रक्त फिल्टर करून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. पण किडनीने काम करणं बंद केलं तर काय होईल? किडनी खराब झाल्यावर शरीराच्या इतर अवयवांमध्ये वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. इतकंच नाही तर किडनी खराब झाल्यावर शरीरात वेगवेगळ्या अवयवांमध्ये वेदना सुरू होतात. याला तुम्ही किडनी खराब झाल्याचं सुरूवातीचं लक्षण मानू शकता.
पोटात वेदना
पोटात सतत वेदना होत असेल तर हे केवळ इन्फेक्शन नसेल. अनेकदा किडनी खराब झाल्याचाही हा संकेत असू शकतो. किडनी खराब झाल्यावर मेटाबॉलिज्म रेट प्रभावित होते आणि रूग्णांमध्ये डायरियाची लक्षण दिसू लागतात. पोटात खूप जास्त वेदना होते. जर पोटात सतत वेदना होत असेल तर याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
पाठदुखी
किडनी खराब झाल्यावर पाठीमध्येही वेदना सुरू होतात. पाठीच्या खालच्या भागात जास्त वेदना होत असेल, उठताना किंवा बसताना जोरात वेदना होत असेल तर हा संकेत किडनी खराब झाल्याचा आहे. तसेच जर कोणतंही काम करत असताना समस्या येत असेल, तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. अशी समस्या असल्यावर पेनकिलर घेणं टाळा.